आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारी सुरु होणार चित्रीकरण:'बधाई हो' नंतर आता 'बधाई दो', सिक्वेलची घोषणा; राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार सिल्व्हर स्क्रिन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बधाई हो' या चित्रपटात आयुष्मान खुराणा आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' या चित्रपटाचा आता लवकरच सिक्वेल येणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे. 'बधाई दो' असे या चित्रपटाचे नाव असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 'बधाई हो'चे निर्माते जंगली पिक्चर्सने नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. दोघेही या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

'बधाई हो' या चित्रपटात आयुष्मान खुराणा आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या.

महिला पोलिस ठाण्यातील अधिका-याच्या भूमिकेत राजकुमार
'बधाई दो'मध्ये राजकुमार राव दिल्लीतील पोलिस अधिका-याची भूमिका साकारत आहे, जो महिला पोलिस ठाण्यातील एकमेव पुरुष अधिकारी असतो. तर चित्रपटात भूमी ही पीटी टीचरची भूमिका साकारताना दिसेल. बधाई दो या चित्रपटाची पटकथादेखील बधाई होचे लेखक अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी यांची आहे. तर हर्षवर्धन कुलकर्णी याचे दिग्दर्शक आहेत.

  • राजकुमार राव या भूमिकेबद्दल आनंदी आहे

आपल्या भूमिकेविषयी राजकुमार राव म्हणाला - हळूहळू गोष्टी सुरळित होत आहेत, याचा मला आनंद आहे. बधाई दो हा माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. यातील भूमिकेबद्दल मला आनंद आहे. ही अशी एक व्यक्ती आहे, जिच्या अवती भोवती आणि स्वत: भोवती खूप समस्या आहेत, ज्याचे त्याला निराकरण करायचे आहे. चित्रपटाची कहाणी बधाई होपेक्षा अगदी वेगळी आहे, प्रेक्षकांना यातील पात्र पाहून आनंद होईल.

दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी म्हणाले - कौटुंबिक ड्रामा कायम एव्हरग्रीन अशतो. संपूर्ण कुटुंबासमवेत बसून याचा आनंद घेता येतो. राजकुमार रावसोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे आणि याबद्दल मी खूप उत्साही आहे. कोरोनाच्या काळात, आम्हाला अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला आणि राजकुमार आणि भूमी यांची केमिस्ट्रीदेखील खूप छान जुळून आली आहे.

बातम्या आणखी आहेत...