आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेलर आउट:राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर ‘रुही’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला,  11 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार चित्रपट

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकुमार रावने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'रुही' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट 11 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्वत: राजकुमार रावने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना त्याने लिहिले, 'रुही'चा ट्रेलर स्वत:च्या जोखमीवर पहा, कारण यावेळी 'मर्द को ज्यादा दर्द होगा', असे कॅप्शन राजकुमारने दिले आहे.

हार्दिक मेहता दिग्दर्शित या चित्रपटात वरुण शर्मासुद्धा मुख्य भूमिकेत आहे. तसेच पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना देखील चित्रपटात दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला राजकुमार आणि वरुण शर्मा जान्हवीला किडनॅप करताना दिसत आहेत. त्यानंतर तिला ते जंगलात घेऊन जातात.

सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘रुही-आफजा’ असे ठेवण्यात आले होते. मात्र या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता ‘रुही’ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे.

यापूर्वी सोमवारी चित्रपटाचे टीझर पोस्टर शेअर करताना जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “भूतिया शादी में आपका स्वागत है.” चित्रपटाची कथा मृगदीपसिंग लांबा यांनी लिहिली आहे. मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...