आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rajkummar Rao And Patralekhaa Tie The Knot, Priyanka Chopra, Taapsee Pannu, Anil Kapoor And Others Celebs Congratulate Newlywed Couple On Social Media

बधाई हो:पत्रलेखासोबत लग्नाच्या बेडीत अडकला राजकुमार राव, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दिल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 नोव्हेंबर रोजी राजकुमार आणि पत्रलेखा यांचे लग्न झाले.

अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या नात्याचे रुपांतर लग्नात केले आहे. चंदीगड येथे थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. आता चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देत आहेत.

राजकुमार रावने लग्नानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहे. यातील पहिल्या फोटोत राजकुमार राव आणि पत्रलेखा एकमेकांचा हात पकडून डोक्याला डोकं लावून हसताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत राजकुमार राव हा पत्नी पत्रलेखाच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. हे दोन फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले, 'अखेर 11 वर्षांचे प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मजामस्तीनंतर मी माझा आत्मा, चांगला मित्र, माझे कुटुंब आणि माझे सर्व काही असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केले आहे. आज मला तुझा पती म्हणण्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही. फक्त आजसाठी नाही तर कायमचे आणि त्यानंतरही.' राजकुमार आणि पत्रलेखाच्या या फोटोंवर प्रियांका चोप्रा, तापसी पन्नू आणि अनिल कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंका चोप्राने लिहिले की, "मी रडत नाहीये, तू रडत आहेस! अभिनंदन, wohoooo।." अनिल कपूर यांनी लिहिले, "माझ्या मित्रांनो अभिनंदन.. मी सेलिब्रेट करण्यासाठी चंदीगडमध्ये असतो तर... मिस्टर आणि मिसेस राजकुमार-पत्रलेखा मुंबईत परतल्यावर लवकरच भेटू." तापसीने लिहिले, "तुम्ही दोघे मला प्रत्यक्षात 'एकमेकांसाठी' हा खरा अनुभव देता! अभिनंदन." दिया मिर्झाम्हणाली - 'अभिनंदन. प्रेम आणि कायम प्रेम."

राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या फोटोजमध्ये आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट होती. पत्रलेखाने लग्नात सप्तपदी घेतेवेळी खास लेहंगा परिधान केला होता. तिच्या या लेहंग्यासोबत तिने परिधान केलेल्या ओढणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर तिने राजकुमारसाठी एक खास संदेश लिहिला होता. पत्रलेखाने परिधान केलेल्या या ओढणीवर बंगाली भाषेत काही खास ओळी लिहिण्यात आल्या होत्या. ‘अमर पोरन भौरा भालोबाशा अमी तोमर शो मोर पोन कोरिलम,’ अशा ओळी तिच्या ओढणीवर लिहिण्यात आल्या आहेत. ‘मी माझे प्रेमळ हृदय तुझ्याकडे सोपवते,’ असा या शब्दांचा अर्थ होतो. पत्रलेखानेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. 'मी आज माझ्या सर्वच गोष्टींसोबत लग्न केले आहे. माझे प्रेम, माझा क्राईम पार्टनर, माझे कुटुंब. गेल्या 11 वर्षातील माझा सर्वात चांगला मित्र. तुझी पत्नी होण्यापेक्षा मोठी कोणतीही भावना नाही. आमच्यासाठी कायमचे,' असे तिने म्हटले आहे.

13 नोव्हेंबरला झाला दोघांचा साखरपुडा
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा 13 नोव्हेंबर रोजी साखरपुडा झाला. या सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. साखरपुड्याची थीम ऑल व्हाइट ठेवण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राजकुमारने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला लग्नाची मागणी घालत तिला अंगठी घातली. पत्रलेखानेही गुडघ्यावर बसून अंगठी घातली. साखरपुड्यानंतर 14 नोव्हेंबरला (रविवार) दोघांचा मेहंदी आणि संगीता सोहळा पार पडला. या दोघांच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये मोजकेच पाहुणे सहभागी होत असल्याने लग्नाची तयारी अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती.

दोघेही 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत
राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीदरम्यान पत्रलेखाने सांगितले होते की, तिने 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटात राजकुमार रावला पहिल्यांदा पाहिले होते. पत्रलेखाला प्रथमदर्शनी राजकुमार चित्रपटातील पात्राप्रमाणे विचित्र असल्याचे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. दुसरीकडे राजकुमारने पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले होते आणि त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पत्रलेखा आणि राजकुमार 2010 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2014 मध्ये आलेल्या 'सिटी लाइट' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...