आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज-लेखा वेडिंग:राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची लग्नपत्रिका व्हायरल, आज चंदिगडच्या ओबेरॉय सुखविलास हॉटेलमध्ये होणार लग्न

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकुमार रावच्या एका फॅन पेजने हे कार्ड सोशल मीडियावर शेअर केले आहे.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा आज (15 नोव्हेंबर) चंदिगडमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नाआधी त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाची पत्रिका समोर आल्याने त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण कोणते आहे हे समोर आले आहे.

राजकुमार रावच्या एका फॅन पेजने हे कार्ड सोशल मीडियावर शेअर केले आहे. व्हायरल झालेली ही लग्नपत्रिका पत्रलेखाच्या बाजुची आहे. या यात ‘पत्रलेखा आणि राजकुमार रावच्या विवाहसोहळ्यासाठी सोमवारी 15 नोव्हेंबरला चंदीगढमधील ओबेरॉय सुखविलासमध्ये आमंत्रित करत आहोत,’ असे म्हटले आहे.

13 नोव्हेंबरला झाला दोघांचा साखरपुडा
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा 13 नोव्हेंबर रोजी साखरपुडा झाला. या सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साखरपुड्याची थीम ऑल व्हाइट ठेवण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राजकुमारने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला लग्नाची मागणी घालत तिला अंगठी घातली. पत्रलेखानेही गुडघ्यावर बसून अंगठी घातली. साखरपुड्यानंतर 14 नोव्हेंबरला (रविवार) दोघांचा मेहंदी आणि संगीता सोहळा पार पडला. या दोघांच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये मोजकेच पाहुणे सहभागी होत असल्याने लग्नाची तयारी अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.

लग्नाला फक्त 100-150 लोकच उपस्थित राहणार आहेत.
फराह खान, हुमा कुरेशी, साकिब सलीम, दिग्दर्शक मुदस्सर अजीज 13 नोव्हेंबरला राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. याशिवाय आदिती राव हैदरी आणि 'स्त्री'चे दिग्दर्शक अमर कौशिक 14 नोव्हेंबरला चंदीगडला पोहोचले आहेत. असे म्हटले जात आहे की आयुष्मान खुराणा पत्नी ताहिरा कश्यप आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासोबत लग्नाला उपस्थित राहू शकतो. या लग्नाला केवळ 100-150 लोक उपस्थित राहतील, जेणेकरून लग्नाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

काही वर्षांपूर्वी जेव्हा राजकुमार राव चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगडला आला होता तेव्हा त्याने येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रिपोर्ट्सनुसार, हा लग्नसोहळा अतिशय खासगी असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकुमार आणि पत्रलेखा यांनी चित्रपटसृष्टीतील निवडक पाहुण्यांनाच लग्नासाठी आमंत्रित केले आहे. यात दोघांच्या फॅमिली मेंबर्ससह फ्रेंड्स आणि फिल्म इंडस्ट्रीतील निवड लोकांचा समावेश आहे.

दोघेही 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीदरम्यान पत्रलेखाने सांगितले होते की, तिने 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटात राजकुमार रावला पहिल्यांदा पाहिले होते. पत्रलेखाला प्रथमदर्शनी राजकुमार चित्रपटातील पात्राप्रमाणे विचित्र असल्याचे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. दुसरीकडे राजकुमारने पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले होते आणि त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पत्रलेखा आणि राजकुमार 2010 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2014 मध्ये आलेल्या 'सिटी लाइट' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.

राजकुमारचे आगामी प्रोजेक्ट्स

वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे राजकुमारचा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी 'बधाई दो' या चित्रपटात तो अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. पत्रलेखाचा शेवटचा हिंदी चित्रपट 'नानू की जानू' होता. याशिवाय तिने वेब सीरिज 'बोस/डेड और अलाइव्ह', 'बदनाम गली' आणि 'मैं हीरो बोल रहा हूँ' मध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...