आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूली वेड्स:राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, फोटो शेअर करून नवविवाहित जोडप्याला दिल्या शुभेच्छा

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघेही 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 11 वर्षांच्या नात्याचे रुपांतर लग्नात केले आहे. सोमवारी हे दोघे चंदीगडमध्ये विवाहबद्ध झाले. सोमवारी सकाळी दोघांचे लग्न झाले आणि त्यानंतर रात्री त्यांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात दोघांच्या कुटुंबीय आणि मित्रांसह चित्रपटसृष्टीतील निवडक कलाकार सहभागी झाले होते. यासोबतच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचले होते. मनोहर लाल यांनी दोघांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोहर लाल खट्टर यांनी शेअर केला राजकुमार आणि पत्रलेखासोबतचा फोटो

मनोहर लाल खट्टर यांनी रिसेप्शनचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "चंदीगड येथे बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या."

रिसेप्शनमध्ये राजकुमार काळ्या रंगाचा टक्सीडो आणि बो टायमध्ये दिसत आहे, तर पत्रलेखाने शालसह रेशमी साडी परिधान केली होती.

तुझी पत्नी होण्यापेक्षा मोठी कोणतीही भावना नाही

पत्रलेखाने लग्नात सप्तपदी घेतेवेळी खास लेहंगा परिधान केला होता. तिच्या या लेहंग्यासोबत तिने परिधान केलेल्या ओढणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर तिने राजकुमारसाठी एक खास संदेश लिहिला होता. पत्रलेखाने परिधान केलेल्या या ओढणीवर बंगाली भाषेत काही खास ओळी लिहिण्यात आल्या होत्या. ‘अमर पोरन भौरा भालोबाशा अमी तोमर शो मोर पोन कोरिलम,’ अशा ओळी तिच्या ओढणीवर लिहिण्यात आल्या आहेत. ‘मी माझे प्रेमळ हृदय तुझ्याकडे सोपवते,’ असा या शब्दांचा अर्थ होतो. पत्रलेखानेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. 'मी आज माझ्या सर्वच गोष्टींसोबत लग्न केले आहे. माझे प्रेम, माझा क्राईम पार्टनर, माझे कुटुंब. गेल्या 11 वर्षातील माझा सर्वात चांगला मित्र. तुझी पत्नी होण्यापेक्षा मोठी कोणतीही भावना नाही. आमच्यासाठी कायमचे,' असे तिने म्हटले आहे.

दोघेही 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीदरम्यान पत्रलेखाने सांगितले होते की, तिने 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटात राजकुमार रावला पहिल्यांदा पाहिले होते. पत्रलेखाला प्रथमदर्शनी राजकुमार चित्रपटातील पात्राप्रमाणे विचित्र असल्याचे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते.

दुसरीकडे राजकुमारने पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले होते आणि त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पत्रलेखा आणि राजकुमार 2010 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2014 मध्ये आलेल्या 'सिटी लाइट' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...