आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूली वेड्स:लग्नानंतर पहिल्यांदाच पत्नी पत्रलेखासोबत दिसला राजकुमार राव, फोटोग्राफरने 'वहिनी' म्हटल्यावर नववधू लाजली

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोग्राफर्सनी पत्रलेखाला म्हटले 'वहिनी'

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 11 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 15 नोव्हेंबर 2021 रोजी चंदिगडमध्ये लग्न केले. लग्नानंतर दोघेही नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. लग्नानंतर दोघांचा हा पहिलाच पब्लिक अपिअरन्स होता. न्यूली मॅरीड राजकुमार आणि पत्रलेखा यांनी फोटोग्राफर्सना भरपूर पोझ दिल्या. यादरम्यान जेव्हा फोटोग्राफरनी पत्रलेखाला 'वहिनी' म्हणून हाक मारली तेव्हा पत्रलेखाला हे ऐकून लाजली.

फोटोग्राफर्सनी पत्रलेखाला म्हटले 'वहिनी'
राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नानंतर चंदीगडहून मुंबईला परत आले आहेत. विमानतळावर राजकुमार पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसला तर पत्रलेखाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. विमानतळावरील राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही पापाराझींसाठी पोज देत आहेत.

दरम्यान काही फोटोग्राफर्सनी पत्रलेखाला वहिनी म्हणून संबोधले, तेव्हा ती थोडी चकीत झाली आणि नंतर राजकुमारकडे बघून तिने स्मितहास्य केले. त्यानंतर दोघेही गाडीतून तिथून निघून गेले.

तुझी पत्नी होण्यापेक्षा मोठी कोणतीही भावना नाही

पत्रलेखाने लग्नात सप्तपदी घेतेवेळी खास लेहंगा परिधान केला होता. तिच्या या लेहंग्यासोबत तिने परिधान केलेल्या ओढणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर तिने राजकुमारसाठी एक खास संदेश लिहिला होता. पत्रलेखाने परिधान केलेल्या या ओढणीवर बंगाली भाषेत काही खास ओळी लिहिण्यात आल्या होत्या. ‘अमर पोरन भौरा भालोबाशा अमी तोमर शो मोर पोन कोरिलम,’ अशा ओळी तिच्या ओढणीवर लिहिण्यात आल्या आहेत. ‘मी माझे प्रेमळ हृदय तुझ्याकडे सोपवते,’ असा या शब्दांचा अर्थ होतो. पत्रलेखानेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. 'मी आज माझ्या सर्वच गोष्टींसोबत लग्न केले आहे. माझे प्रेम, माझा क्राईम पार्टनर, माझे कुटुंब. गेल्या 11 वर्षातील माझा सर्वात चांगला मित्र. तुझी पत्नी होण्यापेक्षा मोठी कोणतीही भावना नाही. आमच्यासाठी कायमचे,' असे तिने म्हटले आहे.

दोघेही 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीदरम्यान पत्रलेखाने सांगितले होते की, तिने 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटात राजकुमार रावला पहिल्यांदा पाहिले होते. पत्रलेखाला प्रथमदर्शनी राजकुमार चित्रपटातील पात्राप्रमाणे विचित्र असल्याचे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते.

दुसरीकडे राजकुमारने पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले होते आणि त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पत्रलेखा आणि राजकुमार 2010 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2014 मध्ये आलेल्या 'सिटी लाइट' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...