आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नासाठी चंदीगडला पोहोचली हुमा कुरेशी, आज मेहंदी सोहळा; उद्या वाजणार सनई चौघडे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केवळ निवडक लोकच लग्नाला उपस्थित राहतील

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा 14 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या डेस्टिनेशन वेडिंगचे काउंटडाऊनही चंदीगडमध्ये सुरू झाले आहे. शहरातील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. जिथे त्यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, दोघांनाही त्यांच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांची नावे आणि ठिकाण गुप्त ठेवायचे आहे. रिपोर्ट्सनुसार, पत्रलेखाची मैत्रीण आणि अभिनेत्री हुमा कुरेशी त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी चंदीगडला पोहोचली आहे.

हुमा कुरेशी शुक्रवारी चंदीगड विमानतळावर दिसली. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. यादरम्यान हुमाने पांढरी पँट आणि मॅचिंग शर्ट घातला होता आणि फेस मास्कही घातला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार राव आणि पत्रलेखा आधीच दिल्लीहून कारने चंदीगडला पोहोचले आहेत. दोघांचे कुटुंबीयही कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत.

आज मेहंदी सोहळा, उद्या वाजणार सनई चौघडे
पत्रलेखा आणि तिचे कुटुंबीय शिलाँगहून लग्नासाठी चंदीगडला पोहोचले आहेत. 14 नोव्हेंबरला दोघेही लग्न करणार असून 13 नोव्हेंबरला म्हणजेच आज मेहंदी सोहळा होणार असल्याचे समजते. लग्नात येणा-या पाहुण्यांच्या यादीत हुमा व्यतिरिक्त दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याही नावाचा समावेश आहे.

केवळ निवडक लोकच लग्नाला उपस्थित राहतील
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आणखी काही सेलिब्रिटी पाहुणे चंदीगडला पोहोचण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा राजकुमार राव चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगडला आला होता तेव्हा त्याने येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रिपोर्ट्सनुसार, हा लग्नसोहळा अतिशय खासगी असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकुमार आणि पत्रलेखा यांनी चित्रपटसृष्टीतील निवडक पाहुण्यांनाच लग्नासाठी आमंत्रित केले आहे. यात दोघांच्या फॅमिली मेंबर्ससह फ्रेंड्स आणि फिल्म इंडस्ट्रीतील निवड लोकांचा समावेश आहे.

दोघेही 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत

राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीदरम्यान पत्रलेखाने सांगितले होते की, तिने 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटात राजकुमार रावला पहिल्यांदा पाहिले होते. पत्रलेखाला प्रथमदर्शनी राजकुमार चित्रपटातील पात्राप्रमाणे विचित्र असल्याचे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे नव्हते. दुसरीकडे राजकुमारने पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले होते आणि त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पत्रलेखा आणि राजकुमार 2010 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2014 मध्ये आलेल्या 'सिटी लाइट' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.

राजकुमारचे आगामी प्रोजेक्ट्स

वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे राजकुमारचा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी 'बधाई दो' या चित्रपटात तो अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. पत्रलेखाचा शेवटचा हिंदी चित्रपट नानू की जानू होता. याशिवाय तिने वेब सीरिज 'बोस/डेड और अलाइव्ह', 'बदनाम गली' आणि 'मैं हीरो बोल रहा हूँ' मध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...