आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट वेडिंग इफेक्ट:पत्रलेखाशी लग्नानंतर राजकुमार रावचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, अभिनेत्याने सांगितले लग्नानंतरचे मजेशीर किस्से

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रलेखा माझे सर्वस्व आहे

अभिनेता राजकुमार रावने 11 वर्षे डेट केल्यानंतर गर्लफ्रेंड पत्रलेखाशी लग्न केले. या कपलने नोव्हेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर राजकुमारने आता एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्यातील मजेशीर गोष्टी शेअर केल्या आहेत. तो म्हणाला, आम्ही आता पती-पत्नी बनण्याचा सराव करत आहोत. लॉकडाऊनमध्ये एकत्र राहिल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

पत्रलेखा माझे सर्वस्व आहे
मुलाखतीत राजकुमार म्हणाला, 'पत्रलेखासोबत लग्न केल्यानंतर मला खूप छान वाटत आहे. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, माझे प्रेम आहे, माझे कुटुंब आहे, माझे सर्व काही आहे. काही दिवस आम्ही एकत्र राहू लागलो. आम्ही लिव्ह इन मध्ये राहत असताना फार कमी दिवस एकत्र असायचो. शुटिंगमुळे मी अनेकदा बाहेर असायचो आणि तीसुद्धा तिच्या शुटिंगमध्ये बिझी होती. पण लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे आम्ही एकत्र राहिलो. आम्हाला एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यावेळी आमच्या हे लक्षात आले की आपण आपले उर्वरित आयुष्य एकत्र घालवू शकतो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.'

मी तिला बायको म्हणतो
राजकुमार पुढे म्हणाला, 'पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर आता मला पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पत्रलेखा आणि मी सध्या पती-पत्नी बनण्याचा सराव करत आहोत. गंमत म्हणून मला तिला आता बायको म्हणायला आवडते. मला एकटा असताना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला आवडायचे. आजही जेव्हा पत्रलेखा शहराबाहेर असते, तेव्हा मी एकटाच चित्रपट पाहायला जातो.'

बातम्या आणखी आहेत...