आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता राजपाल यादवच्या अडचणीत वाढ:विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन, शिवीगाळ केल्याचा आरोप, अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता राजपाल यादवच्या अडचणीत वाढ झाली आहे. शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा त्याच्यावर आरोप असून या प्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
शशांक श्रीवास्तवच्या आगामी चित्रपटात राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहे. सध्या राजपाल उत्तर प्रदेशातील कर्नलगंजमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याला स्कूटर चालवायची होती. पण स्कूटर चालवत असताना क्लच वायर तुटली आणि एका रिक्षाला ती धडकली. त्यामुळे एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. विद्यार्थाला दुखापत झाल्याने त्याने चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे युनिटमधील मंडळींनी त्याच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर विद्यार्थ्याने थेट राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने म्हटलं आहे, "युनिटमधील लोकांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले आहे. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे".

विद्यार्थ्याविरोधातही तक्रार दाखल
शूटिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल विद्यार्थ्याविरोधातही शूटिंग युनिटने तक्रार दाखल केली आहे. दोघांच्याही विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे आता चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे कर्नलगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी राममोहन राय यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...