आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांनी पुन्हा उघडले डोळे:कुटुंबीयांचा दावा - 6 तास उघडले होते डोळे, डॉक्टर म्हणाले - मेंदूमध्ये अद्याप कोणतीही हालचाल नाही

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव मागील एका महिन्यापासून एम्समध्ये दाखल आहेत. राजू यांचे चाहते ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत. बुधवारी रात्री 2 ते सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांनी डोळे उघडले होते. त्यांच्या भावाने ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राजूला 99 डिग्री ताप आहे. त्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढलेले नाही. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने राजू यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

व्हेंटिलेटरचे सर्व पाईप बदलले
राजू यांना ताप आल्यानंतर डॉक्टरांनी व्हेंटिलेटरचे सर्व पाईप बदलले. जेणेकरून राजू श्रीवास्तव यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका होणार नाही. त्याचवेळी डॉक्टरांनी पत्नी शिखा यांना राजू यांनी यापूर्वी ब-याच वेळा डोळे उघडल्याची माहिती दिली. पण जोपर्यंत मेंदूची हालचाल होत नाही तोपर्यंत राजू पूर्णपणे बरे होणार नाहीत.

चौथ्यांदा ताप आला आहे
हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर राजू यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मागील महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दरम्यान 3 वेळा त्यांना ताप आला आहे. 9 दिवसांपूर्वीच त्यांना ताप आला होता आणि 3 दिवस त्यांना 100 डिग्री ताप होता. एम्समध्ये असताना त्यांना चौथ्यांदा ताप आला आहे.

व्हेंटिलेटर काढले जाणार नाही
त्यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी ताप आल्यानंतर व्हेंटिलेटर न काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राजूची किडनी, हृदय, यकृत, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य आहे.

मुलीने डोळे उघडण्याचा दावा केला होता

त्याच्या भावाने सांगितले की, राजूची मुलगी अंतरा त्यांना पाहण्यासाठी आयसीयूमध्ये गेली होती. मुलीने वडिलांना म्हटले की, बाबा डोळे उघडा, किती दिवस इथे पडून राहणार. हे ऐकून त्यांच्या डोळ्यांची हालचाल झाली होती. मात्र डॉक्टरांनी ते स्वीकारण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...