आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची गेल्या 10 दिवसांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु आहे. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून ते व्हेंटिलेटवर आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीशी संबंधित अनेक वृत्त समोर येत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी शहानिशा करण्यासाठी आम्ही त्यांचे पुतणे आणि दिग्दर्शक कुशल श्रीवास्तव यांच्याशी बातचीत केली. कुशल 10 ऑगस्टपासून एम्समध्ये राजू श्रीवास्तव यांच्यासोबत आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, राजू श्रीवास्तव ब्रेन डेड नसून त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा दिसून आली आहे.
कुशल श्रीवास्तव सांगतात, "जेव्हापासून काका राजू श्रीवास्तव एम्समध्ये दाखल झाले आहेत, तेव्हापासून मी हॉस्पिटलमध्ये आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होतेय. लोकांच्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. हळूहळू प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. अजून आठवडा लागेल. त्यानंतर सीटी स्कॅन होईल. पुर्वीपेक्षा ते आता चांगला प्रतिसाद देत आहेत. सर्व अवयव रिव्हर्स करत आहेत. प्रत्येकांवर थोडा थोडा परिणाम झाला होता. परंतु आता सर्व काही प्रतिसाद देत आहे. शरीर हळूहळू व्यवस्थित रिकव्हर होईल. पण याला वेळ लागेल," असे कुशल सांगतात.
खाण्यापिण्याबाबत कुशल पुढे म्हणाला- "ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत, त्यामुळे जेवण करु शकत नाहीये. मेडिकल लिक्विड त्यांना दिले जात आहे. होय, आर्गन्स चांगला प्रतिसाद देत आहे. डॉक्टर सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना चांगले संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बर्याच गोष्टी आहेत, ज्या सांगणे कठीण जाईल, परंतु समजून घ्या की ते आपल्याला चांगले संकेत देत आहेत."
कुशल श्रीवास्तव हे राजू श्रीवास्तव यांचे पुतणे आहेत. कुशल सांगतात- 'राजू माझे सख्खे काका आहेत. मी 2006 पासून मुंबईत त्यांच्यासोबत राहतो. मी एक चित्रपट दिग्दर्शक आहे. मी 'बोडका डायरी', 'स्पीड डायल', 'लव्ह बर्ड' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.' राजू काकांच्या प्रकृतीसाठी चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करावी आणि खोट्या बातम्या पसरवू नयेत असे आवाहन कुशल यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.