आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकच्या 17 दिवस आधी मृत्यूची केली होती चर्चा:राजू म्हणाले होते - असे काम करा की यमराजही घ्यायला आले तर ते म्हणतील तुम्ही

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले आहे. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. जो त्यांनी हार्ट अटॅक येण्याच्या 17 दिवसाआधी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये राजू यांनी यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला होता. राजू म्हणाले होते, असे काम करता की यमराजही म्हणतील भावा तू रेड्यावर बस, मी पायी चालतो.

जेव्हा राजू यांनी केला होता यमराजाचा उल्लेख

या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव यांनी यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला होता. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव त्यांच्या गजोधर शैलीत बोलताना दिसले होते. ते म्हणाले होते, “नमस्कार, काही नाही, निवांत बसलो आहे. आयुष्यात असे काम कर की, यमराज तुम्हाला न्यायला तर तो म्हणाला पाहिजे, भाऊ तुम्ही रेड्यावर बसा. तुम्ही चालत आहात, हे योग्य दिसत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात.” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

राजू श्रीवास्तव यांनी व्हिडिओ शेअर करत यमराजचा उल्लेख केला होता.
राजू श्रीवास्तव यांनी व्हिडिओ शेअर करत यमराजचा उल्लेख केला होता.

10 ऑगस्ट रोजी आला होता हृदयविकाराचा झटका

10 ऑगस्ट रोजी राजू जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजू यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. मधल्या काळात राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. गायक कैलाश खेर यांनीही राजू यांच्या आरोग्यासाठी महामृत्युंजयचे पठण केले होते.

1993 मध्ये झाले होते राजूचे लग्न
राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1936 रोजी कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. राजू यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे सरकारी कर्मचारी होते आणि छंद म्हणून कविता लिहायचे. लोक राजू यांच्या वडिलांना बलाई काका म्हणून ओळखत होते. राजू यांनी 1993 मध्ये शिखा श्रीवास्तवसोबत लग्न केले होते. या कपला दोन मुले आहेत, आयुष्मान हे त्यांच्या मुलाचे तर अंतरा हे मुलीचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...