आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्कारातील 8 निवडक छायाचित्रे:अखेरचा निरोप देताना पत्नी शिखाने फोडला हंबरडा

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी निधन झाले. गुरुवारी दिल्लीतील निगमबोध स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाऊ आणि मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, इंडस्ट्रीतील मित्र आणि चाहते त्यांना अखेरचा निरोप दिला. राजू यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले.

राजू यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पूर्णपणे खचल्या आहेत. त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शिखा यांच्या चेहऱ्यावर पतीला गमावल्याचे अतीव दु:ख स्पष्ट दिसत आहे. हृदय पिळवटून टाकणारा त्यांचा हा फोटो आहे.

राजू यांना अखेरचा निरोप देताना शिखा यांनी हंबरडा फोडला. राजू यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

राजू यांच्या अंत्यसंस्काराला दिग्दर्शक मधुर भांडारकरही उपस्थित होते.

राजू यांच्या अखेरच्या प्रवासासाठी रुग्णवाहिका पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आली होती.

कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने चाहतेही राजू यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते.

राजूला अखेरचा निरोप देताना पत्नी शिखाला अश्रू अनावर झाले.

राजू यांच्या भावाने आणि मुलाने त्यांना मुखाग्नी दिला.

राजू श्रीवास्तव यांचे भाऊ आणि कुटुंबीय अतिशय भावूक झाले होते.

एहसान कुरेशी यांनीही आपल्या मित्राला अखेरचा निरोप दिला. त्यांची आणि राजूची 17 वर्षे जुनी मैत्री होती.

बातम्या आणखी आहेत...