आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचा प्रयत्न:न्यूरोफिजिओथेरपीची मदत घेतली जातेय, हातापायांची हालचाल वाढली

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजू श्रीवास्तव यांचा मेंदू वगळता संपूर्ण शरीर सामान्यपणे कार्यरत आहे. मेंदूतील संसर्गही कमी झाला आहे. त्यांना शुद्धीवर आणण्यावर आता डॉक्टरांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आता राजू यांना न्यूरो फिजिओथेरपी देण्यात येत आहे. तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. राजू यांची मुलगी अंतरा हिनेही वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

मेंदूच्या दोन भागात ऑक्सिजनचा पुरवठा होतोय
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजू यांच्या फोरब्रेन (मेंदूच्या वरच्या भागात) मध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ते शुद्धीवर येऊ शकत नाही. तिथे ऑक्सिजन पोहोचला तर त्यांना शुद्धीवर यायला वेळ लागणार नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुमारे 20 मिनिटे राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. यामुळे ते कोमात गेले. मेंदूच्या उर्वरित 2 भागांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतोय.

पत्नी शिखा, मुलगी अंतरा, मुलगा आयुष्मानसोबत राजू श्रीवास्तव. (फाइल फोटो)
पत्नी शिखा, मुलगी अंतरा, मुलगा आयुष्मानसोबत राजू श्रीवास्तव. (फाइल फोटो)

व्हेंटिलेटरचा आधार कमी करण्याचा प्रयत्न
राजूच्या कुटुंबीयांचे निकटवर्तीय सुनील कनोजिया यांनी सांगितल्यानुसार, डॉक्टर त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 15 दिवसांपासून ते पूर्णपणे कोमात आहे. व्हेंटिलेटरचा आधार कमी करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पत्नी शिखाशिवाय कोणालाही आयसीयूमध्ये प्रवेश दिला जात नाहीये.

कानपूरमध्ये राजू यांचे धाकटा भाऊ काजू यांच्या पत्नी श्रेया यांनी कडुलिंबाचे रोप लावले आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.
कानपूरमध्ये राजू यांचे धाकटा भाऊ काजू यांच्या पत्नी श्रेया यांनी कडुलिंबाचे रोप लावले आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.

हातापायांमधील हालचाल वाढली
10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने बेशुद्ध झालेल्या राजू यांना अद्याप शुद्ध आलेले नाही. मात्र, आता त्यांच्या हातापायांची हालचाल पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांची वैद्यकीय ग्रोफ खूपच मंद आहे. मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरही कॉन्फिडंट आहेत. एम्सच्या न्यूरो हेड डॉ. पद्मा श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घशातून दिला जात आहे ऑक्सिजन
राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांचे व्हेंटिलेटर हळूहळू एक किंवा दोन दिवसात काही तासांसाठी काढले जाऊ शकते. यापूर्वीही एकदा तासाभरासाठी त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. आता व्हेंटिलेटरचा आधार कमी करण्यात आला आहे. ऑक्सिजन तोंडावाटे न देता घशावाटे छिद्रातून ट्यूबद्वारे दिला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...