आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना विकावे लागले होते वडिलोपार्जित घर:राजू यांनी त्याच घरमालकाची 10 वर्षे केली मनधरणी; 8 पट किंमत मोजूून परत मिळवले घर

कानपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजू श्रीवास्तव हे अत्यंत साध्या कुटुंबातील होते. त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा त्यांचे वडील बलई काकांना 1990 मध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर विकावे लागले. किदवईनगर नयापुरवा येथे हे घर होते. राजू यांचा जन्म इथेच झाला. राजू यांचे आपल्या वडिलोपार्जित घरावर प्रचंड प्रेम होते. राजू यांनीच या घराला काका कोठी असे नाव दिले होते.

राजू यांनी हे घर सजवले आहे.
राजू यांनी हे घर सजवले आहे.

वडिलांना परत त्याच घरी नेले
राजूचे मित्र मुकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, 1990 मध्ये राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव (बलाई काका) यांनी काही कारणामुळे हे घर सुरेश सिंह चौहान यांना साडेतीन लाख रुपयांना विकले होते. घर विकल्यानंतर राजू खूप दुःखी होते. त्यांनी कुटुंबाला वडिलोपार्जित घरी परत आणण्याची शपथ घेतली.

राजू यांनीच या घराला काका कोठी असे नाव दिले.
राजू यांनीच या घराला काका कोठी असे नाव दिले.

भाड्याच्या घरात राहिले कुटुंब
घर विकल्यानंतर संपूर्ण कुटुंब काही दिवस बारादेवी येथे तर काही दिवस यशोदा नगर येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यावेळी राजू श्रीवास्तव हे मुंबईतच राहत होते. घर परत घेण्यासाठी राजू यांनी मुंबईत खूप कष्ट केले. यादरम्यान त्यांनी सुरेशकडून सुमारे 10 वर्षे घर परत घेण्याची विनंती करत राहिले, मात्र सुरेश हे घर परत राजू यांच्या कुटुंबीयांना विकण्यास तयार नव्हते.

राजू यांच्या निधनाचे वृत्त समजताच घराबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजू यांच्या निधनाचे वृत्त समजताच घराबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

8 पट जास्त किंमत चुकवली
राजू आणि त्यांच्या वडिलांनी शेजारी असलेल्या शिवेंद्र पांडे यांच्याकडे जाऊन सुरेश सिंग यांच्याशी बोलण्यास सांगितले. अनेक वर्षे मनधरणी करण्यात गेली. 2000 मध्ये राजू यांनी 8 पट जास्त पैसे देऊन हे घर 24 लाख रुपयांना विकत घेतले. घर विकत घेतल्यानंतर राजू यांचे वडील पुन्हा कुटुंबासह येथे आले.

राजू यांच्या सर्व आठवणी वडिलोपार्जित घरात ठेवल्या आहेत.
राजू यांच्या सर्व आठवणी वडिलोपार्जित घरात ठेवल्या आहेत.

घरात खूप शांतता मिळते असे म्हणायचे
राजू यांचे धाकटा भाऊ काजूची पत्नी श्रेयाने सांगितले की, राजू यांना या घराची खूप ओढ होती. इथे राहिल्याने खूप शांतता मिळते, असे ते म्हणायचे. कोविड काळात लॉकडाऊन दरम्यान ते याच घरात राहिले. इथे तो संपूर्ण परिसरातील लोक, जुने मित्र आणि लहान मुलांना भेटत असायचे.

बातम्या आणखी आहेत...