आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गजोधर भइया'चा सफरनामा:राजू श्रीवास्तव यांनी 100 देशांमध्ये 4000 हून अधिक शो केले, उभी केली 20 कोटींची संपत्ती

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी निधन झाले. आपल्या 29 वर्षांच्या कारकिर्दीत राजू यांनी केवळ भारतीयांनाच नव्हे तर 100 देशांतील लोकांना स्टेज शोद्वारे खूप हसवले. 4000 हून अधिक शो करून लोकांना हसवणाऱ्या राजू यांच्या निघून जाण्याने सगळ्यांचे डोळे पाणावले आहेत.

लहानपणी राजू यांना कॉमेडियन नव्हे तर अमिताभ बच्चनसारखा हीरो व्हायचे होते. एके दिवशी राजू आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कानपूरहून मुंबईत आले, पण हा प्रवास सोपा नव्हता. येथे राजू यांना ऑटो चालवून उदरनिर्वाह करावा लागला. राजू आपल्या प्रतिभेने प्रवाशांना खूप हसवायचे. त्यांच्या ऑटोत बसलेल्या एका व्यक्तीने त्यांना स्टेज शोची पहिली संधी दिली, यासाठी राजू यांना फक्त 50 रुपये मिळाले होते. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. लवकरच राजू यांनी आपल्या कौशल्याने खूप नाव कमावले आणि 20 कोटींची संपत्ती कमावली.

29 वर्षांच्या कारकिर्दीत राजू यांनी अनेक स्टेज शो, रिअ‍ॅलिटी शो, कॉमेडी शो आणि 20 चित्रपटांमध्ये काम केले.

आता राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित या बातम्याही वाचा.

कानपूर राजू यांच्या संघर्षाची संपूर्ण कहाणी येथे वाचा.

पीएम राजू यांना श्रद्धांजली वाहताना कोण काय म्हणाले येथे वाचा...

बातम्या आणखी आहेत...