आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध विनोदवीर आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रमुख राजू श्रीवास्तव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजू यांनाच नव्हे तर त्यांचे सल्लागार अजित सक्सेना आणि पीआरओ गर्वित नारंग यांनाही धमकीचे फोन कॉल आले आहेत. यानंतर राजू यांनी गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणाची दखल घेऊन मदत मागितली आहे.
...नाही तर कमलेश तिवारीसारखी परिस्थिती करु
राजू यांनी याप्रकरणी कानपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आली असून पोलिस याबाबत तपास करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना व्हॉट्स अॅप कॉलवर हा धमकीचा फोन आला आहे. यात त्यांच्या पत्नी आणि मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोबतच लखनौच्या कमलेश तिवारीसारखी परिस्थिती करु असेही, या अज्ञात इसमाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी राजू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वीदेखील राजू यांना असाच धमकीचा फोन आला होता. त्यावेळीदेखील त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
म्हणून येत आहेत धमकीचे फोन
हा धमकीचा फोन पाकिस्तानमधील कराची येथून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजू यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ते यूपीच्या माफिया आणि बेकायदा बांधकाम करणार्यांविरूद्ध आणि भारत पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत असल्याबद्दल बोलत आहेत. म्हणूनच त्यांना तसेच त्यांची पत्नी आणि मुलांनाही धमकावले जात आहे.
राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदवीर आहे. त्यांनी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘बिग बॉस 3′,’ स्टॅण्ड अप कॉमेडी’ अशा रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. याशिवाय अनेक चित्रपटांमध्येही ते झळकले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.