आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Raju Srivastava Famous Bollywood Movie | Raju Most Memorable Characters Now 5 Famous Film Characters Of Raju, 5 Most Popular Dialogues Of Comedy

'गजोधर-भइया'ने 17 चित्रपटांमध्ये सोडली अभिनयाची छाप:1988 ते 2017 पर्यंत प्रेक्षकांना हसवणारा राजू, 'तेजाब' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष होते 1988. शहेनशाह, कयामत से कयामत तक आणि तेजाब सारख्या चित्रपटांची चर्चा सिनेमागृहांपासून गल्ल्यापर्यंत सुरु होती. तो काळ टिपिकल हिरो असलेल्या चित्रपटांचा होता, ज्यात लोक फक्त मुख्य नायक पाहण्यासाठी टॉकीजवर जात असत. पण याततच एका सामान्य चेहऱ्याने लोकांना स्वतःकडे खेचले. नाव होतं... राजू श्रीवास्तव.

राजू हे पहिल्यांदा 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात दिसले. या चित्रपटात त्यांची छोटी भूमिका होती. पण, आपल्या अभिनयाने त्यांनी बड्या चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधून घेतले. याच कारणामुळे एका वर्षानंतर म्हणजेच 1989 मध्ये राजश्री प्रॉडक्शनने त्यांचा मेगा प्रोजेक्ट 'मैंने प्यार किया' मध्ये त्यांचा समावेश केला. राजूने 1988 ते 2017 पर्यंत 17 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर जाणून घेऊया प्रसिद्ध चित्रपटातील राजूचे 5 पात्र आणि कॉमेडीचे 5 लोकप्रिय संवाद...

चित्रपट: आमदनी अठन्नी खर्चा रुपैया
भूमिका: बाबा चिन चिन चू
रिलीज वर्ष: 2001

2001 मध्ये प्रदर्शित झालेला आमदनी अठन्नी खर्चा रुपैया या चित्रपटात अभिनेता गोविंदा, जुही चावला, तब्बू आणि जॉनी लीव्हर यांनी भूमिका साकारल्या होत्या. राजूने या चित्रपटात 'बाबा चिन चिन चू' नावाच्या गुंडाची भूमिका केली होती. यात ते एका सेठच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी जातो. या चित्रपटातील त्यांचा मेरा नाम चिन चिन चू बाबा चिन चिन चू, कर डालूंगा तेरे को हाऊ डू यू डू' हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता.

चित्रपट: भावनाओं को समझो
भूमिका: दया फ्रॉम गया
रिलीज वर्ष: 2010

2010 मध्ये आलेल्या भावना को समझो या चित्रपटात राजूने वसूली करणाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील पात्राचे नाव 'दया फ्रॉम गया' असे होते. या चित्रपटातील स्मशानभूमीतील एक दृश्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यात दया एका मृतदेहाला जिवंत करतो. तेव्हा तो म्हणतो की, 'I am Daya from Gaya, दे दे ब्याज दे, ब्याज दे, ब्याज दे रे...मारो ब्याज दे।'

चित्रपट: बिग ब्रदर
भूमिका: ऑटो रिक्शा ड्राइवर
रिलीज वर्ष: 2007

बिग ब्रदर हा एक अ‍ॅक्शन चित्रपट होता. यात सनी देओल मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील राजू श्रीवास्तवची ऑटो ड्रायव्हरची भूमिका लोकांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटातील एका दृश्यादरम्यान राजू त्याच्या सहचालकांसोबत विनोद करत असतो. तो मित्रांना एक प्रसंग सांगत असतो. त्यात तो म्हणतो की, "भइया कल हमारे ऑटो में एक बुजुर्ग बैठा। बार-बार हल्के होने के लिए ऑटो रुकवा रहा था। तंग आकर हमने पूछा भइया आपको चैन नहीं है क्या। इस पर उन्होंने कहा कि बेटा चेन तो है, लेकिन खुल नहीं रही है।" इसके बाद सभी जोर-जोर से हंसने लगते हैं।

चित्रपट: बॉम्बे टू गोवा​​​​​​​

भूमिका: हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय​​​​​​​
रिलीज ​​​​​​​वर्ष:
2007

2007 च्या बॉम्बे टू गोवा चित्रपटात राजू हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयच्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटात राजू एका रुग्णाला व्हील चेअरवरुन उपचारासाठी घेऊन जात असतात. यादरम्यान ते रुग्णाला भुताच्या गोष्टी सांगून घाबरवता. कथा सांगताना ते रुग्णाला पायऱ्यांखाली फेकून देतात.

चित्रपट: जहां जाइएगा, हमें पाइएगा
भूमिका: नोकर​​​​​​​
रिलीज ​​​​​​​वर्ष: 2007

जहां जाइएगा, हमें पाइएगा हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला क्राइम-थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात राजू हे सेठ कादर खानच्या नोकराच्या भूमिकेत दिसले होते. एका दृश्यात आपल्या मालकाच्या खिशातून 10 रुपये चोरतता. पण मालक त्यांना पकडतो. हा सीन अजूनही यूट्यूबवर चांगलाच व्हायरल आहे.

​​​​​​​

या पात्रांशिवाय राजू श्रीवास्तव हे बाजीगर चित्रपटात चार्लीच्या मित्राच्या भूमिकेत, मैं प्रेम की दिवानी हूं मध्ये नोकराच्या भुमिकेत आणि मैंने प्यार किया या चित्रपटात ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसले होते. तसेच अमिताभ बच्चन आणि इतर सिनेतारकांची त्यांची मिमिक्रीही लोकांचा चांगलीच आवडली होती.

राजू यांच्या फिल्मोग्राफीशी संबंधित माहिती ग्राफिकमधून जाणून घेऊया...

कॉमेडीतील राजू यांचे 5 सर्वाधिक लोकप्रिय संवाद

न्हावीच्या नावाने राजू यांना कॉमेडी किंग बनवले, तर लोअर बर्थ आणि लालूंची मिमिक्रींने त्यांना ओळख दिली.

राजू श्रीवास्तव... हे नाव ऐकताच चेहऱ्यावर हसू उमटते. गजोधर, संकट, बैजनाथ, पुत्तन अशी नावे मनात येतात. राजू यांनी या नावांचा वापर आपल्या कॉमेडीत इतका केला की ही नाव देशभर गाजली. गजोधर हे तर इतके लोकप्रिय झाले की, राजू श्रीवास्तव यांनाच या नावाने ओळखले जाऊ लागले.

राजू श्रीवास्तव यांना यशाच्या शिखरावर पोहचवणारे त्यांचे 5 प्रसिद्ध कॉमेडी डायलॉग्स आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा त्यांचे उपनाव गजोधर भैया या नावामागची गोष्ट जाणून घेऊ.

गजोधर भैय्या यांच्या छातीवर गिटार
उन्नावमधील बिघापूर गावात राजू श्रीवास्तव यांच्या मामाचे घर आहे. राजू यांनी सांगितले होते की, आम्ही लहानपणी मामाच्या घरी जायचो. तेव्हा तिथे केस कापायला एक न्हावी यायचा. त्याचे नाव होते गजोधर. त्याच्या छातीवर गिटारचा टॅटू होता. टॅटूबद्दल विचारल्यावर गजोधर सांगायचे की, जेव्हा तिथे खाजवतो. तेव्हा गिटार वाजते. तो न्हावी ऐवढा मजेशीर होता की त्याचे नाव माझ्या जिभेवर रुळले.

राजू हे द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोच्या पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. हा फोटो त्याच शो दरम्यानचा आहे.
राजू हे द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोच्या पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. हा फोटो त्याच शो दरम्यानचा आहे.

टी टाइम मनोरंजन या टीव्ही शोमधून राजू यांनी कॉमेडीमध्ये पदार्पण केले. येथे तो सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजीसोबत दिसला होते. 3 जून 2005 रोजी, जेव्हा द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सुरू झाले, तेव्हा राजूचे नशीब पुन्हा एकदा उजळले. त्यांनी येथे गजोधर बनून सर्वांची मने जिंकली.

आता त्याच्या 5 सर्वोत्तम संवादांकडे वळूया...

संवाद १: स्टेशनवर पोहोचल्यावर गजोधर ​​​​​​​
राजूच्या कॉमेडीचा मोठा भाग रेल्वे स्टेशनच्या आसपासचा असायचा. "ऐ यादव, संकठा, गजोधर, बिरजू, ई ट्रेन अपना छूटा या बाजू वाला" हे इतके लोकप्रिय झाले होते की आजही त्यावर बहुतेक मीम बनवले जातात. राजू यांचा आवाज असलेले छोटे व्हिडिओ बनवले जात आहेत.

संवाद २: रेल्वे डब्ब्यात खालच्या बर्थच्या तिकिटासाठी लढा
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या मंचावर राजू यांनी लोवर बर्थवर धडाकेबाज कॉमेडी केली होती. यात एक व्यक्ती 500 रुपये जास्त देऊन लोअर बर्थचे तिकीट घेतो. मस्त प्रवास करत असताना एक महिला आपल्या म्हाताऱ्या सासूसोबत येते आणि खालचा बर्थ देण्याची विनंती करते. तेव्हा गजोधर खालचा बर्थ त्यांना देतात. काही वेळ पडून राहिल्यानंतर ते झोपून लोकांना चप्पल देण्याच्या भूमिकेत येतात.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोचे जज शेखर सुमन म्हणाले होते की, राजू हे जितके मजेदार कॉमेडी करतात, तितकेच त्याच्या चेहऱ्याचे हावभाव चांगले असतात.
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोचे जज शेखर सुमन म्हणाले होते की, राजू हे जितके मजेदार कॉमेडी करतात, तितकेच त्याच्या चेहऱ्याचे हावभाव चांगले असतात.

संवाद 3: जागते रहो, मेरे भरोसे न रहो (जागे राहा, माझ्यावर विश्वास ठेवू नका.) राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची कथा सांगितली होती. यात इमारतीतील सर्व लोक जमले आणि गार्डला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण तो जागते रहो असे ओरडायचा पण नंतर हळूच बोलायचा, मेरे भरोसे न रहो माझ्यावर विश्वास ठेवू नका.

संवाद 4: गोरे बनवणारी क्रिम
राजूने कधीच कोणाच्या वर्णावर विनोद केला नाही. गोरे करणार्‍या क्रीमच्या जाहिरातीवर ते सातत्याने टीका करत. लाफ इंडिया लाफ शोमध्ये ते म्हणाली होते की, जन्मत: गोरे असलेले विराट कोहली हे गोरे बनवणाऱ्या क्रीमची जाहिरात करत आहे. जर तुमच्यात गोरे बनण्याची क्षमता आहे, तर ते माझ्यावर तपासून पाहा.

डायलॉग 5: कतरिनाचे नाव सावित्री असते तर काय झाले असते?
राजू श्रीवास्तव कपिल शर्माच्या प्रसिद्ध शो कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये पोहोचले होते. यावेळी अभिनेत्रीच्या नावाने त्यांनी कॉमेडी सुरू केली. कतरिनाचे नाव सावित्री देवी, आलिया भट्टचे नाव सत्यवती, कपिलचे नाव रमाशंकर, सिद्धूचे नाव अयोध्या प्रसाद असते तर? ते इतके लोकप्रिय झाले असते का?

यानंतर राजू म्हणाले, काही जिल्हे असे आहेत की ते एखाद्या कोपऱ्यात लाजाळू मुलीसारखे उभे आहेत. उदाहरणार्थ, बरेली, उरई, परैल, पुरी, पुणे, चुरु।​​​​​​​ तर काही ठिकाणांची नावे ही गर्वाने भरल्याप्रमाणे आहेत, जसे कर्नाटक, चित्तौडगड, भटिंडा, हावडा, काटगोदाम, हावडा, नाला सोपारा.​​​​​​​

कपिल शर्माच्या प्रसिद्ध शो कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना राजू श्रीवास्तव
कपिल शर्माच्या प्रसिद्ध शो कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना राजू श्रीवास्तव

राजू यांच्या कॉमेडीचे टॉप-५ डायलॉग्स आपण पाहिले. त्यांनी एकदा स्टँडअप कॉमेडीवर एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते की, मी मुंबईत आलो तेव्हा लोक कॉमेडियनला चांगला अभिनेता मानत नव्हते. त्यावेळी विनोद जॉनी वॉकरपासून सुरू झाला आणि जॉनी लीव्हरवर संपला. तेव्हा स्टँड अप कॉमेडीला वाव नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत मला पाहिजे ते मिळू शकले नाही.

टीप: बातम्यांमध्ये समाविष्ट केलेले व्हिडिओ YouTube वरून घेतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...