आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अतिशय चिंताजनक:मेंदूने काम करणे बंद केले - सुनील पालची माहिती

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा अतिशय चिंताजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितल्यानुसार, कुटुंबाला आता चमत्काराची अपेक्षा आहे. डॉक्टरांनीही आता उत्तर दिले आहे. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केल्याचे सुनील पाल यांनी सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोलकत्याहून न्युरोलॉजिस्ट डॉ. पद्मा श्रीवास्तव यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

बुधवारी रात्री उशिरापासून त्यांना वारंवार झटके येत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली आहे. त्यांचे मोठे भाऊ सीपी श्रीवास्तव यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या मेंदूला सूज आल्याने पाणी आढळले आहे. डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.” कुटुंबातील सदस्य आणि अनेक नातेवाईक दिल्ली एम्समध्ये पोहोचले आहेत.

दुसरीकडे राजू श्रीवास्तव यांच्यासाठी औषधोपचारांसह देवाला साकडे घातले जात आहेत. काशी विश्वनाथ धाम आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात महामृत्यूंजर मंत्राचा जप केला जातोय.

गायक कैलाश खेर यांनी दिला होता 21 पंडितांकडून जप करुन घेण्याचा सल्ला
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. उपचारांमुळे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. पण ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत. 4 दिवसांपूर्वी गायक कैलाश खेर यांनीही 21 गुरुजींना राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मृत्युंजय जप करण्यास सांगितले होते. राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी आता कुटुंबीय देवाकडे प्रार्थना करत आहेत.

महामृत्युंजय मंत्र अकाली मृत्यूपासून वाचवतो

पुजारी धर्मेंद्र कृष्ण यांनी सांगितल्यानुसार, "महामृत्युंजय मंत्राच्या जपाने शिवाचा आशीर्वाद मिळतो. या मंत्राच्या जपाने अकाली मृत्यू टळतो." मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आरोग्यासाठी काशी विश्वनाथ मंदिरात मृत्युंजय जप करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी उज्जैनमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी मृत्युंजय नामजप करण्यात आला होता.

बुधवारी संध्याकाळपर्यंत प्रकृतीत सुधारणा होत होती

राजू यांच्या भावाने सांगितल्यानुसार, बुधवारी संध्याकाळी त्यांचा ताप थोडा कमी झाला होता. मात्र अद्याप व्हेंटिलेटरचा आधार काढण्यात आलेला नाही. राजू यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबातील सदस्य कुटुंबातील जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून त्यांना ऐकवत आहेत. याशिवाय गजोधर, संकठाचे किस्सेही त्यांच्या आवाजात त्यांना ऐकवले जात आहेत.

राजूच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार,, "राजू यांनी नळीवाटे दररोज सुमारे अर्धा लिटर दूध दिले जात आहे. ते प्रत्येक उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. शरीरातील हालचालही सातत्याने वाढत आहेत. ऑक्सिजनचा सपोर्टही 10 टक्के राहिला आहे. रक्तदाबही आता सामान्य आहे. फक्त आता ते शुद्धीवर येण्याची वाट बघितली जात आहे."

बिग बींनी राजू यांच्यासाठी पाठवला मेसेज अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी एक खास ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये अमिताभ म्हणताहेत – उठ राजू, खूप झाले, अजून खूप काम करायचे आहे. आता उठ... आम्हा सर्वांना हसायला शिकवं." हे रेकॉर्डिंग राजू यांना ऐकवले जात आहे.

भेटण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत

राजू यांच्या मोठ्या भावाने सांगितल्यानुसार, "राजूचे चाहते त्यांना भेटण्यासाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. राजू यांना संसर्ग होऊ नये यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने सर्वांचा आयसीयूमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. लोकांनी नातेवाईकांना भेटून राजू यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत."

बातम्या आणखी आहेत...