आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव गेल्या 10 ऑगस्टपासून जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत. डॉक्टरांनी त्यांचा मेंदू कार्य करत नसल्याचे सांगितले आहे. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून देशभरातून चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान आता त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांची राजू यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शिखा यांनी प्रसारमाध्यमांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
राजू यांच्या पत्नी शिखा यांनी ईटाइम्ससोबत बोलताना म्हटले, "त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांचे काम करत आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि राजूजी हे लढवय्ये आहेत, ते ही लढाई नक्कीच जिंकतील. ते संघर्ष करतील आणि तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी परत येईल, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे."
शिखा पुढे म्हणाल्या, "ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण रुग्णालय प्रशासन दिवसरात्र काम करत आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेकजण प्रार्थना आणि पूजा करत आहेत. या प्रार्थना व्यर्थ जाणार नाही, याची मला कल्पना आहे. मला फक्त सर्वांना विनंती करायची आहे की त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी”, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
"डॉक्टर हे देवाचे रुप असल्याचे आपण मानतो. ते खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे सध्या व्हायरल होणाऱ्या अफवा या निराधार आहेत. सर्व काही नीट आहे. ते हा संघर्ष करत असून आपल्याला त्याची धीराने वाट पहावी लागेल. डॉक्टर आणि राजू हे दोघेही लढत आहेत आणि लवकरच याचे सकारात्मक परिणाम सर्वांना मिळतील," असेही त्यांनी सांगितले.
राजू यांच्या तब्येतीबद्दल अफवा न पसरवण्यााची विनंती त्यांनी केली आहे. कारण कुटुंब खूप भावनिक अवस्थेत आहे आणि हे सर्वांसाठी खूप त्रासदायक होते आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
10 ऑगस्ट रोजी आला होता हृदयविकाराचा झटका
राजू यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटका आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना झटका आला होता. दहाव्या दिवशीही त्यांना शुद्ध आलेली नाही. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
राजू यांचे पीआरओ गर्वीत नारंग म्हणाले, "बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यांच्या मेंदूच्या वरच्या भागात सूज आणि पाणी आढळले. त्याला वारंवार झटके येत आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. बुधवारी रात्री स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. पण आता पुन्हा त्यांच्या शरीरातील हालचाली पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाल्या आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.