आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू यांच्या कानपूरमधील घरी चाहत्यांची गर्दी:भाऊ काजू म्हणाले - अंत्यसंस्कार दिल्लीत होणार; योगी म्हणाले - ते नाहीत, पण त्यांचे शब्द कायम राहतील

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर एम्स रुग्णालयाचत उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर चाहत्यांनी राजू यांच्या कानपूरमधील घरी गर्दी केली आहे. तर राजू यांचे भाऊ काजू श्रीवास्तव यांनी निधनाच्या बातमीवर आम्हाला विश्वास बसत नव्हता. तो बरा होऊन घरी येईल याची आम्हाला खात्री होती.

हे चित्र राजू यांच्या घराबाहेरचे आहे.
हे चित्र राजू यांच्या घराबाहेरचे आहे.

काजू म्हणाले- आम्ही दिल्लीला जात आहोत
काजू यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव एम्स येथून दुपारी एक वाजता दिल्लीतील दरशरथपुरी येथे नेण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील द्वारका येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. राजू यांचे घर दशरथपुरी मेट्रो स्टेशनजवळ आहे. पुढे ते म्हणाले की, दिल्लीत राजू यांच्या पत्नी आणि मुलांशी बोलणे झाले आहे. सर्वजण दु:खी आहेत. आम्ही तिकडे जात आहोत. यानंतर काजू हे आपल्या कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले.

राजूविषयी मित्रांनी व्यक्त केल्या भावना

मित्र ज्ञानेश म्हणाले - तो सगळ्यांना मदत करायचा

हा फोटो राजू यांचे मित्र ज्ञानेश मिश्राचा आहे. त्यांनी दिव्य मराठीशी संवाद साधला.
हा फोटो राजू यांचे मित्र ज्ञानेश मिश्राचा आहे. त्यांनी दिव्य मराठीशी संवाद साधला.

ज्ञानेश मिश्रा यांनी राजू यांच्या उदारतेविषयी सांगितले. ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट आली होती. तेव्हा दोन मुलांना मदत हवी होती. त्यांनी मुलांना मुंबईला बोलावले व आर्थिक मदत केली. भोजन व पुस्तके दिली. 25 डिसेंबर 2021 रोजी ते शेवटचे कानपूरला आले होते. त्यांचा केक आम्ही बायपासवरच कापला होता. तिथे त्यांनी गाणीही गायली होती.

'राजू तेरी यारी को खुदा जाना'

हा फोटो राजू यांचे मित्र मेहबूबचा आहे. कानपूरचा वारसा निघून गेल्याचे ते म्हणाले.
हा फोटो राजू यांचे मित्र मेहबूबचा आहे. कानपूरचा वारसा निघून गेल्याचे ते म्हणाले.

मेहबूब म्हणाले की, राजू, मी आणि ज्ञानेश एकत्र गाणी म्हणायचो. भावनिक होत मेहबुब यांनी 'मेरी जिंदगी संवारी, मुझको गले लगाकर, राजू तेरी यारी को, हमने तो खुदा जाना' ही ओळ गायली.आज कानपूरचा वारसा नाहीसा झाला आहे. पृथ्वीवर जर कुणाला देव पाहायचा असेल तर त्यांनी राजूकडे पाहावे. डोळ्यात पाणी आणून तो निघून गेला.

हे छायाचित्र राजू श्रीवास्तव यांच्या घराचे आहे. नातेवाईकांना भेटण्यासाठी लोकांची ये-जा सुरू आहे.
हे छायाचित्र राजू श्रीवास्तव यांच्या घराचे आहे. नातेवाईकांना भेटण्यासाठी लोकांची ये-जा सुरू आहे.

सभागृहात 2 मिनिटे मौन
विधानसभा अध्यक्षांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. सतीश महाना सभागृहात म्हणाले की, राजू श्रीवास्तव आता आपल्यात नाहीत. ते कॉमेडी किंग होते. कानपूर ते मुंबईपर्यंत त्यांनी मेहनतीमुळे हे स्थान मिळवले. साधा स्वभाव असलेले राजू सर्वांनाच आवडले. यानंतर सभागृहात 2 मिनिटे मौन पाळण्यात आले.

  • सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

भेदभाव न करता आपले कर्तव्य पार पाडले - योगी

आज ते आमच्यासोबत नाहीत, पण त्यांचे शब्द कायम राहतील - मुख्यमंत्री योगी
आज ते आमच्यासोबत नाहीत, पण त्यांचे शब्द कायम राहतील - मुख्यमंत्री योगी

सीएम योगी म्हणाले की, "राजू श्रीवास्तव हे यूपी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष होते. ते एक चांगले कलाकार होते. आयुष्यभर त्यांनी कोणताही भेदभाव न करता आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे. ईश्वर त्यांना आशीर्वाद देवो. आज ते आपल्यात नाहीत. पण त्यांचे शब्द कायम राहतील.

'आपल्या मेहनतीने देश आणि जगात आपला ठसा उमटवला'

असे कौशल्य असलेले फार कमी लोक जन्माला येतात - अखिलेश
असे कौशल्य असलेले फार कमी लोक जन्माला येतात - अखिलेश

सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, राजू श्रीवास्तव आता आपल्यात नाहीत. हे खेदजनक आहे. ते एका गरीब कुटुंबातील होते. पण आपल्या मेहनतीने त्यांनी देशात आणि जगात ठसा उमटवला. अशा विनोदी कलाकारांची आणि प्रतिभा जन्माला येते. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे होते.

डीडी नॅशनल शोमधून प्रसिद्ध

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी राजू श्रीवास्तव डीडी नॅशनलच्या टी टाइम मनोरंजन या प्रसिद्ध शोचा एक भाग होता. इथून पुढे त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2005 मध्ये सुरू झालेल्या द ग्रेट इंडियन लाफ्टर शोमध्ये राजूने पहिल्यांदा गजोधरच्या पात्रावर कॉमेडी केली होती. लोकांना ते खूप आवडले. राजूने गजोधर, संकट, बिरजू या पात्रांमधून लोकांना खूप हसवले.

बातम्या आणखी आहेत...