आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांचा ताप नियंत्रणात:काशी-उज्जैनमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप, गुडगावमध्येही भावाच्या घरी पूजा सुरू

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी औषधोपचारांसह आता देवाला साकडे घातले जात आहेत. काशी विश्वनाथ धाम आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप केला जात आहे. राजू यांच्या भावाच्या गुडगावच्या घरीदेखील पुजारी महामृत्युंजय मंत्राचा जप करत आहेत.

त्यांचे भाऊ सीपी श्रीवास्तव म्हणाले, "आता राजूची तब्येत हळूहळू सुधारत आहे, ही दिलासादायक बाब आहे. डॉक्टरांची मेहनत आणि लोकांच्या प्रार्थना कामी आल्या आहेत. आता त्यांचा तापही नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे."

गायक कैलाश खेर यांनी 21 गुरुजींकडून करुन घेतला जप
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. उपचारांमुळे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. पण ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत. 4 दिवसांपूर्वी गायक कैलाश खेर यांनीही 21 गुरुजींना राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मृत्युंजय जप करण्यास सांगितले होते. राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी आता कुटुंबीय देवाकडे प्रार्थना करत आहेत.

महामृत्युंजय मंत्र अकाली मृत्यूपासून वाचवतो

कानपूरमध्ये राजू यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या चाहत्यांनी होम हवन केले.
कानपूरमध्ये राजू यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या चाहत्यांनी होम हवन केले.

पुजारी धर्मेंद्र कृष्ण यांनी सांगितल्यानुसार, "महामृत्युंजय मंत्राच्या जपाने शिवाचा आशीर्वाद मिळतो. या मंत्राच्या जपाने अकाली मृत्यू टळतो." मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आरोग्यासाठी काशी विश्वनाथ मंदिरात मृत्युंजय जप करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी उज्जैनमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी मृत्युंजय नामजप करण्यात आला होता.

रक्तदाब सामान्य आहे, फक्त शुद्धीवर येण्याची वाट बघितली जात आहे
राजू यांच्या भावाने सांगितल्यानुसार, त्यांचा ताप थोडा कमी झाला आहे. मात्र अद्याप व्हेंटिलेटरचा आधार काढण्यात आलेला नाही. राजू यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबातील सदस्य कुटुंबातील जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून त्यांना ऐकवत आहेत. याशिवाय गजोधर, संकठाचे किस्सेही त्यांच्या आवाजात त्यांना ऐकवले जात आहेत.

राजूच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार,, "राजू यांनी नळीवाटे दररोज सुमारे अर्धा लिटर दूध दिले जात आहे. ते प्रत्येक उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. शरीरातील हालचालही सातत्याने वाढत आहेत. ऑक्सिजनचा सपोर्टही 10 टक्के राहिला आहे. रक्तदाबही आता सामान्य आहे. फक्त आता ते शुद्धीवर येण्याची वाट बघितली जात आहे."

भेटण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत
राजू यांच्या मोठ्या भावाने सांगितल्यानुसार, "राजूचे चाहते त्यांना भेटण्यासाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. राजू यांना संसर्ग होऊ नये यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने सर्वांचा आयसीयूमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. लोकांनी नातेवाईकांना भेटून राजू यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत."

बातम्या आणखी आहेत...