आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका:लोकप्रिय कॉमेडियन जिममध्ये व्यायाम करताना कोसळले, दिल्लीच्या एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकारा झटका आल्याने बुधवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ट्रेडमिलवर धावताना छातीत वेदना सुरु झाल्या
राजू श्रीवास्तव यांचे जवळचे सहकारी मकबूल निसार यांनी दिव्य मराठीला राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कासळले. यानंतर राजू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजू यांचे पीआरओ अजित सक्सेना यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव पक्षाच्या काही मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. राजू यांनी 2014 में BJP पक्षात प्रवेश केला होता.

राजू श्रीवास्तव यांच्यावर होणार बायपास शस्त्रक्रिया

राजू यांचे निकटवर्तीय मकबूल निसार पुढे म्हणाले, "राजू यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांच्या टीमने राजू यांचे पूर्वीचे वैद्यकीय अहवाल मागवले आहेत, ज्याच्या आधारे डॉक्टर त्यांची बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतील. मात्र, राजू फिट अँड फाइन राहिले आहेत. ते नियमितपणे जिम करत आहेत. त्यांचे पुढे अनेक शहरांमध्ये शो आहेत. 31 जुलैपर्यंत त्यांनी शो केले होते," अशी माहिती निसार यांनी दिली.

उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत राजू
राजू श्रीवास्तव हे त्यांच्या दमदार विनोदी टायमिंगसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. राजू यांना बालपणापासूनच कॉमेडियन व्हायचे होते आणि त्यांनी त्यांचे हे स्वप्नही पूर्ण केले. स्टेज परफॉर्मर म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती.

स्ट्रगलच्या काळात राजू यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या
अमिताभ बच्चन यांच्या लूक अलाइकसाठी राजू यांना ओळखले जाते. संघर्षाच्या काळात राजू यांनी 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा', 'आमदानी अठ्ठनी खर्चा रुपैया' आणि 'मैं प्रेम की दिवानी हूं' यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मुळे राजू यांनी लोकप्रियता मिळाली. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता.

राजू यांनी 'बिग बॉस 3' या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. 2014 मध्ये राजू यांना समाजवादी पक्षाकडून तिकीट देण्यात आले होते, तरीही त्यांनी काही काळानंतर तिकीट परत केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचा भाग बनवले, त्यानंतर राजू सतत त्यांच्या कार्यक्रमांद्वारे स्वच्छतेशी संबंधित जनजागृती करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...