आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Raju Srivastava Blood Pressure Also Dropped, No Movement In Body | Raju Srivastava News Today |Raju Srivastava Latest News | Raju Srivastava Health | Raju Srivastava Latest News Hindi |

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा:पुतण्या म्हणाला - ते आता धोक्याबाहेर; पत्नीही म्हणाली- ते लवकरच बरे होतील

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा झाली आहे. त्यांचे पुतणे कुशल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता स्थिर असून आठवड्याभराने त्यांचा पुन्हा सीटी स्कॅन डॉक्टर करणार आहेत. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दुसरीकडे राजू यांच्या पत्नी शीखा यांनीही राजू लढवय्ये असून ते लवकरच कमबॅक करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

राजू यांच्यावर मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. याआधी राजू ब्रेन डेड असल्याचे वृत्त आले होते, पण त्यांच्या कुटुंबीयांनी ते वृत्त फेटाळून लावले होते.

राजू यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, कुटुंबातील सर्व सदस्य दिल्ली एम्समध्ये पोहोचले आहेत.

राजू यांचे मित्र आणि कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी सांगितल्यानुसार, 'राजू गेल्या 25-30 तासांपासून बेशुद्ध आहेत. प्रकृती ढासळल्यानंतर केवळ प्रार्थनांचा आधार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आम्ही फक्त ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत.'

लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, 'राजू भाई, हिंमत हारु नका. बस थोडा जास्त जोर लावा.'

राजू यांच्या मोठ्या भावाच्या म्हणण्यानुसार त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे. डॉक्टरांनी बीपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे दिली आहेत, पण त्यांचा प्रभाव संपताच पुन्हा बीपी कमी झाला. त्यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, राजू यांच्या प्रकृतीचा विचार करता संपूर्ण कुटुंब रुग्णालयात उपस्थित आहे.

10 ऑगस्ट रोजी आला होता हृदयविकाराचा झटका
राजू यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटका आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना झटका आला होता. दहाव्या दिवशीही त्यांना शुद्ध आलेली नाही. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर आहेत.

हे छायाचित्र राजू यांच्या कुटुंबाचे आहे. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे सर्व नातेवाईक एम्समध्ये पोहोचले आहेत.
हे छायाचित्र राजू यांच्या कुटुंबाचे आहे. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे सर्व नातेवाईक एम्समध्ये पोहोचले आहेत.

राजू यांचे पीआरओ गर्वीत नारंग म्हणाले, "बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यांच्या मेंदूच्या वरच्या भागात सूज आणि पाणी आढळले. त्याला वारंवार झटके येत आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. बुधवारी रात्री स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. पण आता पुन्हा त्यांच्या शरीरातील हालचाली पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाल्या आहेत."

प्रकृतीसाठी केली जात आहे प्रार्थना

गुरुवारी त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच देशभरातील लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. कानपूरमध्येही त्यांच्या चाहत्यांनी, नातेवाईकांनी पूजा-हवन सुरू केले आहे. कॉमेडियन सुनील पाल यांचा भावूक झालेला व्हिडिओ समोर आला. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते, "राजूसाठी प्रार्थना करा. तो अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. डॉक्टरांनाही काय करावे हे कळत नाही. मेंदूनेही काम करणे बंद केले आहे. राजू भावा लवकर बरा हो."

अभिनेता आणि कॉमेडियन राजपाल यादवनेही व्हिडिओ शेअर करत राजू लवकरात लवकरत बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

राजपाल, मनोज यांचे ट्विट वाचा

हे ट्विट 18 ऑगस्टला करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना राजपाल यादव यांनी हे ट्विट केले.
हे ट्विट 18 ऑगस्टला करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना राजपाल यादव यांनी हे ट्विट केले.
हे ट्विट गीतकार मनोज शुक्ला उर्फ मनोज मुंतशिर यांचे आहे.
हे ट्विट गीतकार मनोज शुक्ला उर्फ मनोज मुंतशिर यांचे आहे.
बातम्या आणखी आहेत...