आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांचे स्वप्न राहिले अपूर्ण:नवोदित विनोदी कलाकारांना प्लॅटफॉर्म देणार होते, OTTवर आणणार होते स्वतःचा शो

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांचे एक स्वप्नदेखील अपूर्ण राहिले. याचा खुलासा करताना राजू यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, ते OTT प्लॅटफॉर्मवर त्यांचा स्टँड अप कॉमेडी शो आणण्याच्या तयारीत होते. ते या शोचे निर्मातेदेखील होते.

नवोदित विनोदी कलाकारांना प्लॅटफॉर्म देऊ इच्छित होते राजू
राजू यांच्या निकटवर्तीयाने पुढे सांगितले की, 'त्यांचा शो एखाद्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम व्हावा अशी त्यांची इच्छा होती. देशभरातील नवोदित विनोदवीरांना या माध्यमातून व्यासपीठ मिळावे यासाठी ते या शोचे नियोजन करत होते. निर्माता म्हणून त्यांनी त्यांच्या शोच्या नियोजनाबाबतही मित्रांशी चर्चादेखील केली होती. त्यांचा प्लॅन पुढे जाण्यापूर्वीच 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.'

कपिल-सुनीलने शेअर केली इमोशनल पोस्ट
राजू यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककला पसरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून इंडस्ट्रीतील अनेकांनी राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कपिल शर्माने राजू यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'आज पहिल्यांदा तुम्ही मला रडवले आहे, राजू भाई, काश आपली आणखी एक भेट झाली असती. देव तुम्हाला त्याच्या चरणी स्थान देवो. तुमची खूप आठवण येईल. अलविदा.. ओम शांती.'

कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू यांना श्रद्धांजली वाहिली.
कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू यांना श्रद्धांजली वाहिली.

दुसरीकडे, सुनील ग्रोव्हरने राजू यांचा फोटो शेअर करत लिहिले, 'राजू श्रीवास्तव जी, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. ज्याने संपूर्ण देशाला खळखळून हसवले. ते खूप लवकर आपल्याला सोडून गेले याचे खूप वाईट वाटते. तुमच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल माझ्या संवेदना.'

सुनील ग्रोवरने एक भावनिक पोस्ट लिहिली.
सुनील ग्रोवरने एक भावनिक पोस्ट लिहिली.

दिल्लीत होणार अंत्यसंस्कार
10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना 42 दिवस दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर होती, मात्र बुधवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. राजू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी द्वारकेतील दशरथपुरी येथे ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...