आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 प्रोजेक्टवर काम करत होते राजू श्रीवास्तव:एक चित्रपट दिवाळीला रिलीज होणार, दुसरा राहिला अपूर्ण

अमित कर्ण11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या चित्रपटांची यादी मोठी आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनिल कपूरपासून सलमान खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट 'कंजूस मक्खीचुस' रिलीज होण्याच्या मार्गावर होता, पण त्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. याशिवाय ते रघुबीर यादवसोबत एक चित्रपट करणार होते, अशी पुष्टी त्यांच्या एका जवळच्या मित्राने केली आहे.

16 ऑगस्टपासून रघुबीर यादवसोबत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणारे होते
राजू यांचे जवळचा सहकारी मकबूल निसार सांगतात, “आम्ही रघुबीर यादव यांच्यासोबत 16 ऑगस्टला चित्रपटाचे शूटिंग करणार होतो. मात्र, 10 ऑगस्ट रोजी राजूभाईंना हृदयविकाराचा झटका आला. आता त्या चित्रपटाबद्दल काय बोलावे? त्या चित्रपटाचे शूटिंग होऊ शकले नाही. दिल्ली आणि डेहराडूनमध्ये याचे शूटिंग होणार होते. राजू भाईंचा एक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे तो म्हणजे 'कंजूस मक्खीचुस'. कुणाल खेमूसोबत या चित्रपटात इतरही अनेक कलाकार आहेत. यामध्ये राजू भाई सरकारी बाबूच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट गदर फेम अनिल शर्मांचा धाकटा भाऊ अनुज शर्मांच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे.'

त्यांचे जाण्याने खूप दुःख झाले आहे
राजू श्रीवास्तव यांची स्मरण करताना अनिल शर्मा म्हणाले, 'राजू यांनी माझ्यासोबतही अनेक चित्रपट केले आहेत. इंडस्ट्रीत नवीन असताना ते रोज आमच्याकडे यायचे आणि आम्हाला खूप हसवायचे. ते फाइट बॅक करतील अशी आम्हाला पूर्ण आशा होती. त्यांचे असे अचानक निघून जाणे अत्यंत दु:खद आहे,' असे शर्मा म्हणाले.

दिवाळीला रिलीज होणार राजू यांचा शेवटचा चित्रपट
कुणाल खेमूसोबतचा राजू श्रीवास्तव यांचा 'कंजूस मक्खीचूस' हा चित्रपट आई-वडील आणि मुलांच्या नात्यावर आधारित आहे. याविषयी बोलताना चित्रपटाचे निर्माते अनुज शर्मा सांगतात, 'या चित्रपटात राजू श्रीवास्तव यांची महत्त्वाची भूमिका आहे. आम्ही तो या दिवाळीत OTT वर प्रदर्शित करत आहोत. हा चित्रपट Zee5 वर येणार आहे. दीपक मुकुट हे आमचे प्रोड्युसर पार्टनरआहेत. यात पियुष मिश्रा, श्वेता त्रिपाठी, अलका अमीन आणि राजीव गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.'

बातम्या आणखी आहेत...