आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू यांची मुलगी अंतराला मिळालाय शौर्य पुरस्कार:वयाच्या 12 व्या वर्षी वाचवले होते आईचे प्राण, चित्रपटसृष्टीशीही आहे घट्ट नाते

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांच्या पश्चात पत्नी शिखा श्रीवास्तव, मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्मान असा परिवार आहे. या तिघांसाठी हा काळ खूप कठीण आहे. दरम्यान, राजू यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव हिची चर्चा होतेय. अंतराला तिच्या शौर्याबद्दल 2006 मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, हे फार क्वचित लोकांना ठाऊक असावे. त्यावेळी ती फक्त 12 वर्षांची होती.

अंतराचे चित्रपटसृष्टीशी घट्ट नाते आहे

अंतरा श्रीवास्तव दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची मुलगी आहे. तिचा जन्म 20 जुलै 1994 रोजी लखनऊमध्ये झाला. अंतरा ही एक चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री आहे. वोडका डायरीज या चित्रपटात ती अभिनेत्री म्हणून दिसली आहे. याशिवाय अंतराने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. अंतरा व्यतिरिक्त राजू आणि शिखा यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव आयुष्मान आहे. तो सितार वादक आहे.

अंतराने वाचवला होता आईचा जीव
अंतराला तिच्या शौर्याबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंतरा 12 वर्षांची असताना तिच्या घरात चोर शिरले होते. चोरट्यांनी अंतराची आई शिखा श्रीवास्तव यांच्यावर बंदूक रोखली होती. त्यावेळी घरात फक्त अंतरा आणि तिची आई या दोघीच हजर होत्या.

त्यानंतर अंतराने धाडस करत तिच्या खोलीच्या खिडकीतून इमारतीच्या वॉचमनला बोलावून घेतले. तसेच चोरट्यांच्या हातून निसटत तिने वडील राजू यांना फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोरट्यांना अटक केली होती.

अगदी लहान वयात चोरांचा सामना केल्याबद्दल अंतराला 2006 चा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता. अंतराला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

वडिलांच्या निधनाच्या अफवेवर अंतराने लिहिली होती एक इमोशनल नोट
काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूची अफवा पसरली होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी अंतराने सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहिले होते. पत्रात तिने लिहिले होते की - 'लोक माझ्या वडिलांच्या मृत्यूची अफवा पसरवत आहेत, यामुळे माझ्या कुटुंबीयांना त्रास होत आहे.'

मात्र, आता राजू या जगात नाही. हा त्यांच्या कुटुंबासाठी कठीण काळ आहे.

बातम्या आणखी आहेत...