आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. घरगुती हिंसाचार, फसवणुकीच्या आरोपात तिचा पती आदिल खान दुर्रानी सध्या तुरुंगात आहे. पण आता आदिलबद्दल राखी सावंत मवाळ झालेली दिसतेय. आदिलला लवकरात लवकर जामीन मिळावा अशी तिची इच्छा आहे. राखीच्या म्हणण्यानुसार, रमजानचा महिना येणार आहे आणि या पवित्र महिन्यात प्रत्येकाला माफी मिळण्याचा अधिकार आहे.
सोबतच राखीने म्हटले आहे की, ती स्वतः आदिलला कधीही माफ करणार नाही कारण त्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने सांगितले होते की, ती रमजान महिन्यात उपवास करणार असून तिची उमराहला जाण्याची इच्छा आहे.
आदिलला जामीन मिळावा अशी माझी इच्छा आहे - राखी
एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी होण्यासाठी राखी दुबईला पोहोचली आहे. तिथे मीडियाने राखीला तिचा पती आदिलबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राखी म्हणाली, 'रमजानचा पवित्र महिना येणार आहे. जेव्हा मी नमाज अदा करत होते तेव्हा मला वाटले की या पवित्र महिन्यात सर्वांना माफी मिळायला हवी. आदिलला म्हैसूर कोर्टातून जामीन मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी वैयक्तिक त्याला कधीच माफ करणार नाही. कारण त्याने माझी फसवणूक केली. मी त्याच्यासाठी चांगली पत्नी होते पण त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी त्याच्यावर इतके प्रेम करायला नको होते,' असे राखी म्हणाली.
राखी म्हणाली- बाहेर येऊन दुसऱ्याचे आयुष्य उध्वस्त करू नको
राखी पुढे म्हणाली, 'आदिलवरील सर्व आरोप अतिशय गंभीर आहेत, मी त्याला मीडियाद्वारे संदेश देऊ इच्छिते की, तो जामिनावर बाहेर जरी आला तरी त्याने दुसऱ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये. त्याने स्वत: ला बदलण्याचा प्रयत्न करावा. जर त्याने दुसऱ्या मुलीशी जरी लग्न केले तरी तिच्यासोबत माझ्याशी जसा वागला तसे वागू नको,' असे राखी आदिलला म्हणाली आहे.
पुन्हा लग्न करणार नाही - राखी
बोलताना राखी पुढे म्हणाली, 'आता मी त्याच्याकडे परत जाणार नाही. आता मला माझे आयुष्य एकट्याने जगायचे आहे. तो जिथे असेल तिथे बरा राहो हीच मी आता त्याच्यासाठी प्रार्थना करेन.'
आदिल दुसरे लग्नही करू शकतो, माझी काही हरकत नाही..
मीडियाने राखीला आदिलची मैत्रीण तनु चंदेलबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, 'तिला आणि आदिलला लग्न करायचे असल्यास माझी काही हरकत नाही. लग्नानंतर तिलाही आदिलचे सत्य कळेल. मी त्याच्याशी एकनिष्ठ होते, म्हणूनच मी इतके दुःख सहन करू शकले. आता मला माझ्या मनात त्याच्याबद्दल सूडाची भावना ठेवायची नाही. मी मोठ्या मनाने माझ्या आयुष्यात पुढे गेले आहे.'
राखीची उमराहला जायची इच्छा
राखी सावंतने काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना उमराह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणाली होती की, ती उमराहला जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करत आहे. येत्या रमजानमध्ये ती रोजा ठेवायचा असल्याचीह तिने सांगितले.
राखीने ती पूर्ण प्रामाणिकपणे इस्लामचे पालन करत असल्याचे म्हटले आहे. ती दिवसातून पाच वेळा नमाजही अदा करते. राखीने म्हटल्यानुसार, आता तिला तिच्या मागील आयुष्याबद्दल विचार करून रडायचे नाही. तिला आता पूर्वीसारखे आनंदी राहायचे आहे.
माझे प्रतिज्ञापत्र जामा मशिदीतून बनवले जात आहे - राखी
माध्यमांशी बोलताना राखी म्हणाली, 'माझा मामा आणि भाऊ हे दोहीघे जामा मशिदीतून माझे शपथपत्र तयार करुन घेत आहेत, जेणेकरून मला व्हिसा मिळू शकेल आणि मी उमराहसाठी जाऊ शकेन. मला माझा व्हिसा मिळेल की नाही हे मला माहीत नाही. मी दिवसातून पाच वेळा नमाजही अदा करते. जर मी उमराहसाठी गेले तर माझे नशीब पालटेल,' असे राखीने म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.