आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंतच्या अडचणी संपता संपेना:नवऱ्याची घटस्फोटाची धमकी, राखीचे आदिलवर गंभीर आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल आणि अभिनेत्री राखी सावंत हिच्या अडचणी संपता संपत नाहीये. गेल्याच आठवड्याच राखीची आई जया यांचे कर्करोगाने निधन झाले. आईच्या निधनाचे दुःख पचवत असताना आता तिच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. राखीचा नवरा आदिलचे दुसऱ्या मुलीशी अफेअर असल्याचा खुलासा राखीने केला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात राखीने आदिल खान दुर्रानीसोबत दुसरे लग्न केले होते. सात महिने लग्न लपवून ठेवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच राखीने लग्न केल्याचे जाहीर केले. पण आता आदिलचे दुसऱ्याच मुलीशी अफेअर असून तो घटस्फोटाची धमकी देत असल्याचा खुलासा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. त्याबरोबरच आदिलचे ज्या मुलीबरोबर अफेअर आहे तिनेही धमकी दिल्याचे राखीने सांगितले आहे.

आदिलने एक नाही तर चार लग्न करणार असल्याची दिली धमकी
प्रसारमाध्यमांशी बोलताना राखी म्हणाली, "आधी पहिल्या नवऱ्याचा ड्रामा घेऊन आली. आता दुसऱ्या नवऱ्याचा ड्रामा करते. माझ्या आईचा मृत्यू झाला, हे पण खोटे आहे का? रात्री आदिल मला म्हणाला की, तू माझे त्या मुलीबरोबरच्या काहीही गोष्टी व्हायरल केल्या तर मी तुला घटस्फोट देईन. मी ते व्हायरल करणार नाही. मी फक्त प्रसारमाध्यमांसमोर येऊन तिला आदिलपासून लांब राहण्याची धमकी दिली आहे," असे राखीने सांगितले.

ती मुलगीदेखील देतेय राखीला धमकी

आता ती मुलगीदेखील फोन करुन मला धमकी देत असल्याचे राखीने सांगितले आहे. "ती मुलगी मला फोन करुन म्हणते की, मी मीडियाला अजिबात घाबरत नाही आणि तुला तर अजिबातच घाबरत नाही. आदिल तुला 100 टक्के घटस्फोट देणारच. तिला याबद्दल अति आत्मविश्वास आहे. तो मला फार आवडतो. मी त्याच्यावर 100 टक्के प्रेम करते. त्यावर मी तिला सुनावले आणि म्हटले की, जो त्याच्या पत्नीबरोबर प्रामाणिक नाही, तो तुझ्याबरोबर कसा असेल. त्यावर तिने म्हटले की तुला त्याला नीट ठेवता आले नाही," असा खुलासा राखीने केला आहे.

आदिलच्या आयुष्यात आल्या तीन मुली

इतकेच नाही आदिलनेदेखील त्या मुलीशी लग्न करण्याची धमकी दिल्याचे राखीने सांगितले आहे. मी एक नाही तर चार लग्न करु शकतो, मला अडवणारे कुणीही नाही, असे आदिलने म्हटल्याचे राखीने सांगितले. गेल्या सात ते आठ महिन्याच्या आमच्या वैवाहिक आयुष्यात मी तीन मुलींना याच्यापासून वेगळे केले आहे, असे राखीने यावेळी म्हटले.

राखी सावंत आणि आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केले होते. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचे मान्य केले होते. राखी बिग बॉस मराठीच्या घरात असताना आदिलचे दुसऱ्या मुलीशी सूत जुळल्याचे कळल्यानंतर राखीने लग्न जगजाहीर केले होते. पण आता या अफेअर प्रकरणामुळे राखीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे.

बातम्या आणखी आहेत...