आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री राखी सावंतने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पती रितेशपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. आता राखीने एका मुलाखतीत रितेशबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि वेगळे होण्याचा निर्णय तिचा नव्हे तर रितेशचा होता, असा खुलासादेखील केला. रितेश जेव्हा मला सोडून जात होता तेव्हा माझ्या आईने त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला होता, असेही राखीने सांगितले.
रितेशने राखीला सोडले
राखी म्हणाली, "तो मला सोडून गेला! मी त्याच्यावर खूप प्रेम केले आणि तो मला सोडून निघून गेला. काही आठवड्यांपूर्वी बिग बॉसनंतर, आम्ही मुंबईतील आमच्या घरी एकत्र राहू लागलो, पण काल त्याने त्याचे सगळे सामान पॅक केले आणि निघून गेला. तो म्हणाला की, तो कायदेशीररित्या खूप अडचणीत आहे कारण त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. म्हणूनच त्याला आता माझ्यासोबत राहायचे नाही. त्याने सांगितले की, त्याला त्याच्या व्यवसायात खूप नुकसान झाले आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा मला समजले की रितेशची एक पत्नी आणि एक मुल आहे, तेव्हा माझे हृदय तुटले. मी एका महिलेवर आणि लहान मुलावर अन्याय करू शकत नाही. आता सगळे संपले आहे, हे सत्य मी स्वीकारले आहे."
राखीच्या आईने रितेशला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला
राखी पुढे म्हणाली, "तो सकाळी कुणाशी तरी फोनवर तासन्तास बोलत होता आणि त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. निघून गेल्यावर मी त्याला अनेकदा फोन केला, पण त्याने एकदाही माझा कॉल उचलला नाही. माझ्या आईनेही जाण्यापूर्वी रितेशला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. हे सर्व पाहून आई रडत होती."
राखीला आधीच वाटत होते की रितेश तिला सोडून जाईल
राखी सांगते, “मला वाटले की तो फक्त ग्रँड फिनालेसाठी थांबला होता. बिग बॉसच्या करारात नमूद होते की जर तू ग्रँड फिनालेला आला नाहीस तर तुला दोन कोटी द्यावे लागतील. मीडियासमोर त्याने मला स्पर्श किंवा किस केले नाही. मीच त्याला किस केले होते. तो खूप लाजाळू होता. तो मला सोडून जाईल, अशी भीती माझ्या मनात सुरुवातीपासूनच होती."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.