आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी छापा टाकत तिच्यासह तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. आता या प्रकरणावर राखी सावंत हिने एक मोठे विधान केले आहे. नेहमी फक्त कलाकारच का पकडले जातात? का कोणत्या मंत्र्याचा मुलगा पकडला जात नाही? असा सवाल राखीने केला आहे.
'एखाद्याने भारतीच्या घरात ड्रग्ज लपवले असतील'
आपल्या आगामी विनाशक काल या चित्रपटाच्या लाँचिंग इव्हेंटवेळी मीडियाशी बोलताना भारती सिंग खूप जवळची मैत्रीण असल्याचे राखीने सांगितले. ‘सध्या जे काही सुरु आहे, अनेकांच्या घरी अचानक छापा घातला जातो आणि तेथे ड्रग्ज मिळतात याची कोणी टीप देत आहे का? या संदर्भात कोणी फोन करुन माहिती देत आहे का? मला याबाबत काहीही माहिती नाही. मला फक्त इतकच हवं आहे नेहमी फक्त कलाकारच का पकडले जातात? का कोणत्या मंत्र्याचा मुलगा पकडला जात नाही? संपूर्ण देशात ड्रग्ज केवळ कलाकारच घेतात का? दुसरे का पकडले जात नाहीत?’ असे राखी म्हणाली आहे.
पुढे ती म्हणते ‘मला हा फंडा समजतच नाही. सर्वात पहिले भारतीसोबत असे काही होऊ शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण ती भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन आहे, तिचा सर्वजण आदर करतात. मी जेव्हा भारतीला अटक झाल्याची बातमी ऐकली तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. भारती आणि हर्ष माझे चांगले मित्र आहेत. मला असे वाटते हे कोणाचे तरी षडयंत्र आहे. कोणी तरी त्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले आणि फोन केला आहे.’
21 नोव्हेंबरला झाली होती भारतीला अटक
भारती सिंहच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या घर आणि ऑफिसमधून जवळजवळ 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. चौकशीत अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिच्यासह तिच्या नव-याला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात केली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामिनाचा अर्ज मंजुर झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.