आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस 14 मध्ये झळकलेली अभिनेत्री राखी सावंत हिने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. मिका सिंगसोबतच्या किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीनंतर राखीची आई जया सावंत तिच्यावर संतापल्या होत्या. तू जन्माला येताच का मेली नाहीस, असे जया सावंत यांनी राखीला म्हटले होते. हा खुलासा स्वतः राखीने या मुलाखतीत केला आहे.
राखी या मुलाखतीत म्हणाली, "माझ्या कुटुंबात बालिका वधूसारखे वातावरण होते. अभिनेत्री होण्यासाठी मला घरसोडून पळावे लागले होते. यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझ्यासोबतचे संबंध तोडले होते. पण, मला खात्री आहे की आज माझे वडील जिथे आहेत तिथे त्यांना माझा अभिमान वाटत असेल. आज मी जे काही आहे ते त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आहे. आजही माझे कुटुंब मला स्वीकारत नाही. माझे मामा आणि इतर नातेवाईक आजही माझ्या आईशी बोलत नाही. मी घर सोडून पळून गेले होते, माझं बघून त्यांच्याही मुली घरातून पळून जातील, अशी त्यांना भीती आहे,' असे राखीने सांगितले.
राखी पुढे म्हणाली, 'लोकांना वाटतं की मी त्यांचे लक्ष वेधून घेते. पण खरं म्हणजे मीडिया माझ्यावर प्रेम करते. एक वेळ अशी होती जेव्हा माझी आई मिका सिंगसोबत झालेल्या वादानंतर माझ्यावर खूप संतापली होती आणि तू जन्माला येताच मेली असती तर बरे झाले असते, असे ती म्हणाली होती. मिका सिंगसोबतच्या वादानंतर माझ्या नातेवाईकांनी माझ्या आईचे जगणे कठीण केले होते. माझे वडील माझ्या आईला मारहाण करत असत. त्यानंतर मी आईला इतकेच सांगितले की मी अमिताभ बच्चन किंवा अनिल कपूर यांची मुलगी नाही, जे माझ्यासाठी कोणतं मुकुट घेऊन बॉलिवूडमध्ये उभे आहेत. तुम्ही मला माझा संघर्ष करू द्या.'
'बिग बॉस 14' मध्ये झळकली होती राखी सावंत
राखी सावंत सलमान खानच्या 'बिग बॉस 14' या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती आणि ती फायनलिस्टमध्ये सामील झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी तिने 14 लाखांची रक्कम घेत अंतिम फेरीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. राखीची आई कर्करोगाने ग्रस्त आहे. आणि आईच्या उपचारांसाठी तिला त्या पैशांची गरज होती. राखीच्या आईच्या उपचारात सलमान खाननेही खूप मदत केली. राखीने सलमानचे आभार मानले. "सलमान भाईमुळे माझी आई वाचली. माझ्या आयुष्यात मला आणखी काहीही नको आहे. मला फक्त माझी आई पाहिजे आहे," अशा शब्दांत राखीने सलमानबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.