आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंतचा प्रवास:अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले राखी सावंतचे बालपण, अनिल अंबानींच्या लग्नात जेवण वाढण्याचे काम करण्यासाठी मिळाले होते 50 रुपये

7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राखीने सोहेल खानकडे काम मिळवून देण्यासाठी मदत मागितली होती.

ड्रामा क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या बिग बॉस 14 या शोमुळे चर्चेत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत राखीने आर्थिक अडचणीचा सामना करत असल्याचा खुलासा केला. सोहेल खानमुळे बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्याचेही तिने सांगितले. राखीने सोहेल खानकडे कामासाठी मदत मागितली होती. त्यानंतर सोहेलने सलमान खानसोबत बोलून राखाली शोमध्ये एंट्री मिळवून दिली.

राखी सावंतचा जन्म 25 नोव्हेंबर 1978 रोजी झाला. तिने बॉलिवूडशिवाय इतर अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अशा एका कुटुंबातून आली आहे, जिथे महिलांना उंबरठ्याबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तरीदेखील तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुटुंबीयांचा विरोध पत्कारुन घर सोडले. इतकेच नाही तर चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी फेस सर्जरी आणि ब्रेस्ट इम्प्लांट केले. एवढे सगळे करुन राखी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरली आणि फक्त आयटम गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.

राखीचे नाव कायम वादात राहाते. पब्लिसिटी मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार असते. एक नजर टाकुयात तिच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टींवर...

वयाच्या 10 व्या वर्षापासून करतेय काम

 • राखीचे खरे नाव नीरु भेडा आहे. तिची आई जया भेडा यांनी पोलिस कॉन्स्टेबल आनंद सावंतसोबत दुसरे लग्न केले होते. त्यानंतर राखीला आपल्या सावत्र वडिलांचे आडनाव मिळाले.
 • राखीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती अशा एका कुटुंबातून आहे, जिथे महिलांना कुठलेच स्वातंत्र्य नाही. तिच्या कुटुंबातील महिला पुरुषांच्या नजरेत नजर टाकून बोलू शकत नाहीत. मुलाखतीत राखीने पुढे सांगितले होते, की संकुचित विचारसरणी असूनदेखील तिचे कुटुंबीय पैशांसाठी मुलींना कामावर पाठवत होते. राखीने वयाच्या 10 व्या वर्षी बिझनेसमन अनिल अंबानींच्या लग्नात जेवण वाढण्याचे काम केले होते. केटरिंगच्या कामासाठी तिला दररोज 50 रुपये मिळत होते.
 • राखी 11 वर्षांची असताना तिने दांडिया खेळण्याचा हठ्ठ धरला होता, त्यामुळे तिच्या आई आणि मामाने तिचे लांब केस कापून टाकले होते. त्याचवेळी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन काम करणार असल्याचा निर्णय राखीने घेतला होता.
 • राखीने मुंबईतील विले पार्लेस्थित गोकलीबाई हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
 • राखीने सांगितले होते, 'जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत कामाच्या शोधात होते तेव्हा माझ्याजवळ चांगले कपडे नव्हते. जे असेल ते कपडे परिधान करुन मी लोकांना भेटत होते. तेच कपडे आज फॅशनमध्ये आहेत.'
 • राखीने अभिनेत्री होण्यासाठी आपले घर सोडले होते. जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिने काम मिळवण्यासाठी निर्मात्यांच्या ऑफिसचे उंबरठे झिजवले होते. तिला तिच्या लूकमुळे काम मिळत नव्हते. त्यामुळे तिने फेस सर्जरीसोबतच ब्रेस्ट इम्प्लांट केले. त्यानंतर राखीला काम मिळायला सुरुवात झाली खरी पण ती अभिनेत्री म्हणून नव्हे तर आयटम गर्ल म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकली.
 • राखीने 1997 मध्ये आलेल्या 'अग्निचक्र' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. जोरु का गुलाम, ये रास्ते है प्यार के, जिस देश में गंगा रहता है या चित्रपटांमध्ये तिने काम केले.
 • 2003 मध्ये आलेल्या मोहब्बत है मिर्ची या गाण्याने राखीचे नशीब पालटले. हे गाणे चार ऑडिशन दिल्यानंतर तिला मिळाले होते. त्यानंतर ती मस्ती आणि मैं हू ना या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसली होती.
 • राखी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात टॉप फोर मध्ये पोहोचली होती. याशिवाय तिने 'नच बलिए 3', 'ये है जलवा', 'अरे दीवानों मुझे पहचानों', 'राखी का स्वयंवर' या रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे.
 • राखी तीन वर्षे डान्सर अभिषेक अवस्थीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिने 'राखी का स्वयंवर' या रिअॅलिटी शोमध्ये एनआरआय इलेश परुजनवालासोबत साखरपुडा केला होता, पण काही महिन्यांनी तिने ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले होते.
बातम्या आणखी आहेत...