आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन 2021:कार्तिक आर्यन, दीपिका पदुकोणपासून ते रणवीर सिंहपर्यंत, या लोकप्रिय सेलेब्सची भावंडे लाइमलाइटपासून राहतात दूर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या त्यांच्याविषयी...

बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण लोकप्रिय सेलिब्रिटींचे काही बहीणभाऊ मात्र स्वतःला ग्लॅमर वर्ल्ड आणि लाइमलाइटपासून दूर ठेवतात. खास रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला प्रसिद्ध कलाकारांच्या प्रसिद्धीझोतापासून दूर राहणा-या काही बहीणभावंडांविषयी सांगत आहोत...

कार्तिक आर्यन - कृतिका तिवारी

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याची धाकटी बहीण कृतिकाच्या खूप जवळ आहे. लॉकडाऊनच्या काळात कार्तिकने अनेकदा आपल्या बहिणीसोबतचे मजेशीर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना त्यांची झलक दाखवली. कृतिका परदेशात राहत असून मेडिकलचे शिक्षण घेत आहे.

दीपिका पदुकोण - अनिशा पदुकोण

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोणची धाकटी बहीण अनिशा प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. अनिशा दीपिकापेक्षा लहान आहे आणि तिने तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिडा क्षेत्रात करिअर केले आहे. अनिशा एक प्रोफेशनल गोल्फ प्लेअर आहे.

अनुष्का शर्मा - कर्णेश

अभिनेत्री अनुष्का शर्माचा धाकटा भाऊ कर्नेश निर्माता आहे. अभिनेत्रीने तिच्या भावासोबत मिळून 2019 मध्ये क्लीन स्लेट या नावाने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे. त्यांच्या या बॅनरखाली आतापर्यंत 'पाताललोक' आणि 'बुलबुल' या सीरिज बनवण्यात आल्या आहेत.

प्रियांका चोप्रा- आकाश चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा धाकटा भाऊ आकाश हा शेफ आहे. आकाशने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. प्रियांका तिच्या भावाच्या खूप जवळ आहे.

रणवीर सिंह- रितिका भवानी

बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंह त्याची मोठी बहीण रितिकाला आपल्या आईसारखा मानतो. रितिका अत्यंत ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे, परंतु ती स्वतःला कॅमेरा आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवते.

शाहरुख खान- शहनाज खान

बॉलिवूडचा बादशाह शाहरुखची बहीण शहनाजला खूप कमी लोकांनी पाहिले आहे. भाऊ शाहरुख लक्झरी लाइफ जगत असताना, शहनाज सामान्य जीवन जगणे पसंत करते.

ऐश्वर्या राय- आदित्य राय

अभिनेत्री ऐश्वर्या राय तिचा थोरला भाऊ आदित्यच्या खूप जवळ आहे. आदित्य एक मर्चंट नेव्ही इंजिनिअर आहे. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आदित्य ऐश्वर्यासोबत दिसत असतो.

भूमी पेडणेकर - समिक्षा

टॉयलेट: एक प्रेम कथा आणि पती पत्नी और वो सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या बहिणीसोबत दिसत असते. समिक्षा अगदी भूमीसारखीच दिसते आणि बरीच ग्लॅमरस देखील आहे. तिने वकिलीमध्ये करिअर केले आहे.

तापसी पन्नू - शगुन

साऊथ आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी तापसी पन्नू हिची बहीण शगुन एक वेडिंग प्लॅनर आहे. शगुन अनेकदा तापसीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत असते. दोघींचे फोटो सोशल मीडियावर पसंत केले जातात.

बातम्या आणखी आहेत...