आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन स्पेशल:रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन... या चित्रपटांतून दिसले भावा-बहिणीतील प्रेम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सणावर अनेक चित्रपटही आले आहेत.

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. भावा-बहिणीतील स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणावर अनेक चित्रपटही आले आहेत. यानिमित्त आम्ही तुम्हाला काही चित्रपटांची माहिती देत आहोत.

  • छोटी बहन- 1959

बहीण-भावाच्या प्रेमावर बनलेल्या लोकप्रिय चित्रपटापैकी एक "छोटी बहन'ची चर्चा होते. १९५९मध्ये बनलेल्या या चित्रपटाचे गाणे "भैया मेरे राखी के बंधन को निभाना...' आजही प्रसिद्ध आहे. यात बलराज साहनी, नंदा, महमूद रहमान मुख्य भूमिकेत होते.

  • हरे रामा हरे कृष्णा- 1971

या चित्रपटात एक मुलगा आपल्या हरवलेल्या बहिणीचा शोध घेतो. शेवटी त्याला ती भेटते. तिला घेऊन तो घरी परत येतो. बहीण भावाच्या नात्यावरील ही एक भावनिक कथा होती. यात मुख्य भूमिकेत देव आनंद आणि जीनत अमान होते.

  • रेशम की डोरी- 1974

आत्माराम दिग्दर्शित या चित्रपटात भाऊ-बहिणीचे प्रेम दाखवण्यात आले. धर्मेंद्र आणि त्यांच्या बहिणीचे प्रेम पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते. या चित्रपटातील गाणे "बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है..' आजही लोकप्रिय आहे. महिला-मुलींचे आवडते गाणे आहे.

धर्मात्मा- 1975

यात रक्षाबंधनचे एक दृश्य आहे. बहिणीच्या पतीने आपल्या वडिलांचा खून केल्याची माहिती जेव्हा फिरोज खानला होते तेव्हा तो रागात आणि सूड घेण्यासाठी तिच्या घरी जातो. तेव्हा बहीण (फरीदा जलाल) त्याला राखी बांधते, पतीसाठी विनंती करते.

  • सनम वेबफा- 1991

या चित्रपटात एक मुस्लिम मुलगी आपल्या मैत्रिणीच्या पाच राजपूत भावांना राखी बांधते. हिंदु-मुस्लिमांतील प्रेमाचे नाते आहे. क्लायमॅक्समध्ये तेच राजपूत भाऊ मुस्लिम बहिणीच्या मदतीसाठी धावून येतात. हा प्रसंग प्रेक्षकांना भावला.

  • हम साथ साथ हैं- 1999

सूरज बडजात्या यांचा हा चित्रपट आयकॉनिक मानला जातो. यात रक्षाबंधनाचे दृश्य खूपच भावनिक पद्धतीने दाखवण्यात आले. यात नीलम, सलमान खान, सैफ अली खान आणि मोहनीश बहल यांच्या हातावर राखी बांधते.

  • फिजा- 2000

या चित्रपटात हृतिक रोशन आणि करिश्मा कपूर भाऊ-बहिणीच्या भूमिकेत आहेत. दंगलीत फिजाचा भाऊ अमान कशा पद्धतीने गायब होतो. शेवटी बहिणीचे प्रेम जिंकते ती आपल्या भावाला शोधते आणि त्याला घरी आणते, अशी या चित्रपटाची कथा आहे.

  • माय ब्रदर निखिल- 2005

चित्रपटात जुही चावलाने एड्स पीडित भावाच्या मदतीसाठी लढणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आहे. ती त्याच्यासाठी पूर्ण जगाशी लढते. आयुष्यातील शेवटचे दिवस त्याला सुखात जगता यावेत म्हणून ती लोकांशी भांडते.

बातम्या आणखी आहेत...