आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस क्लॅश:आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'सोबत होणारेय 'रक्षाबंधन'ची टक्कर, हे 11 चित्रपटसुद्धा एकमेकांशी भिडणार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या यावर्षी प्रदर्शित होणा-या मोठ्या चित्रपटांविषयी -

बॉलिवूडमध्ये यावर्षी अनेक मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. मात्र, लवकरच चित्रपट प्रदर्शित करण्याच्या शर्यतीत अनेक चित्रपट एकमेकांशी बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. आणि त्याचा परिणाम निश्चितच चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो. त्यामुळे काही चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा होऊ शकतात, ही शक्यता नाकारता येणार नाही. कारण त्यांचा प्रेक्षकवर्ग विभागला जाईल. नुकतीच, अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे, या चित्रपटाची टक्कर आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा'शी टक्कर देणार आहे. याशिवाय अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार आहेत. चला जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल :-

अक्षय कुमार स्टारर 'रक्षाबंधन' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचदिवशी आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' देखील मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

हृतिक रोशनचा आगामी 'विक्रम वेधा' हा चित्रपट आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर साऊथचा चित्रपट 'पोनिंयिन सेलवन' बॉक्स ऑफिसवर 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.

कंगना रनोटचा 'तेजस' हा आगामी चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.

अक्षय कुमारचा 'रामसेतू' हा चित्रपट 22 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी त्याची टक्कर अजय देवगणच्या 'थँक गॉड' या चित्रपटाशी होणार आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत.

डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर 2 नव्हे तर 3 चित्रपटांची टक्कर होणार आहे. रणवीर सिंगचा 'सर्कस', टायगर श्रॉफचा 'गणपत' आणि कतरिना कैफचा 'मेरी ख्रिसमस' हे चित्रपट एकाच वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...