आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरण:रिया चक्रवर्तीसोबतच्या चॅटवर स्पष्टीकरण देताना रकुल प्रीत सिंग म्हणाली, 'डुब' ही रोल्ड सिगारेट असते, ड्रग्ज नाही

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चक्रवर्तीने रकुलचे नाव तपास यंत्रणेसमोर उघड केले होते.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची चौकशी केली आहे. रिपोर्ट्सनुसार रिया चक्रवर्तीने तिचे नाव तपास यंत्रणेसमोर उघड केले होते. त्यानंतर तिला समन्स पाठविण्यात आले.

चौकशीदरम्यान, रकुलने रिया चक्रवर्तीसोबतच्या आपल्या ड्रग्जच्या बातचीतविषयी सांगितले. तिने एनसीबीच्या अधिका-यांना सांगितले की, चॅटमध्ये ज्या डूबचा उल्लेख केला गेला आहे, ती एक रोल्ड सिगारेट असते, त्यात अमली पदार्थ किंवा ड्रग्ज नसते.

  • समन मिळाल्याचे नाकारले होते

गुरुवारी सकाळी रकुल प्रीतने तिला एनसीबीकडून समन मिळाल्याचे नाकारले होते. मात्र नंतर समन मिळाल्याचे मान्य केल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले होते. तिने आपला पत्ताही अपडेट केला होता. सुरुवातीला रकुलने समन मिळाला नसल्याचे बहाण केला होता. त्यावेळी एनसीबीने सांगितले होते की, तिच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

  • साऊथ इंडस्ट्रीत कमावले नाव

रकुलची कॉलेजपासूनच अभिनेत्री व्हायची इच्छा होती. यामुळेच तिने कॉलेजमध्ये असताना वयाच्या 18 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. 2009 मध्ये तिने कन्नड चित्रपट गिल्लीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2011 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला ज्यात तिने पाच टायटल आपल्या नावी केले. यानंतर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी रकुल हैदराबादला शिफ्ट झाली. तिने केरतम हा तेलुगु चित्रपट आणि ठदाईयारा या तामिळ चित्रपटांद्वारे पदार्पण केले. त्यानंतर वेंकटद्री एक्सप्रेस, करेंट थीगा, रफ, किक 2, ध्रुवा, स्पायडर या चित्रपटांमध्ये ती झळकली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर 2017 मध्ये तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने रकुलची निवड बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून करण्यात आली.

  • बॉलिवूडमधील सुरुवात ठरली फ्लॉप

दक्षिणेत हिट झाल्यानंतर रकुलने 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यारियां हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता जो फ्लॉप ठरला. चार वर्षांनंतर ती अय्यारीमध्ये दिसली. 2019 'दे दे प्यार दे', 'मरजावां'मध्येही ती झळकली. 2020 मध्ये तिचा 'शिमला मिर्च' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हे चित्रपटदेखील फ्लॉप ठरले होते. रकुल फिटनेस फ्रीक आहे. ती दोन जिमची मालक आहे. एक जिम हैदराबाद आणि दुसरे विशाखापट्टणममध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...