आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रकुल प्रीत सिंगला ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स:ED ने 19 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले, पाच वर्षे जुने आहे प्रकरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या अडचणीत वाढ झाली आहे. टॉलिवूड ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने तिला समन्स बजावले आहे. ईडीने रकुलला 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी ईडीने सप्टेंबर महिन्यात रकुलला चौकशीसाठी बोलावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने टॉलिवूडमधील अनेक कलाकारांची चौकशी केली आहे.

2017 चे आहे हे प्रकरण
विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी रकुलची सुमारे अडीच तास चौकशी केली होती. या प्रकरणी इतर अनेक कलाकारांनाही समन्स बजावण्यात आले होते. तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017 मध्ये 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होती आणि 12 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी 11 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

ईडीने या प्रकरणाची चौकशी केली केल्यानंतर त्यांना मनी लाँड्रिंगचा संशय आला. त्यांनी या संदर्भात तपास सुरू केला असून रकुल प्रीत तसेच चार्मे कौर, पुरी जगन्नाथ, तेजा, मुमैथ खान आणि राणा दग्गुबती यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलण्यात आले आहे.

रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात रकुलचे नाव आले होते समोर
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रकुल प्रीत सिंगला चौकशीसाठी बोलावले होते. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान रकुलचे नाव पुढे आले होते. ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला 20 पानी जबाब दिला होता.

आपल्या जबाबात तिने 25 बॉलिवूड सेलेब्सची नावे घेतली होती. ज्यात रकुलच्या नावाचाही समावेश होता. पण चौकशीदरम्यान रकुलने तिच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

दाक्षिणात्य चित्रपटांमधून करिअरची सुरुवात
रकुल प्रीत सिंगने तिच्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली होती. तेलुगु चित्रपट 'किर्तम' आणि तमिळ चित्रपट 'ठदाईयारा थाक्का'द्वारे तिने पदार्पण केले. त्यानंतर ती 'वेंकटद्री एक्सप्रेस', 'करेंट थीगा', 'रफ', 'किक 2', 'ध्रुवा', 'स्पायडर' या चित्रपटांमध्ये दिसली. साऊथमध्ये नाव कमावल्यानंतर रकुलने 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

'यारियां' हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता, जो फ्लॉप ठरला होता. चार वर्षांनंतर ती 'अय्यारी'मध्ये दिसली. 2019 मध्ये आलेल्या 'दे दे प्यार दे', 'मरजावां'मध्ये ती झळकली. 2020 मध्ये तिचा 'सिमला मिर्च' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 2022 मध्ये अजय देवगणसोबतचा तिचा 'रनवे 34' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

रकुल प्रीतचा आगामी चित्रपट 'छत्रीवाली' आहे. या चित्रपटात रकुल एका कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...