आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगली बातमी:7 दिवसांनी रकुल प्रीत सिंगची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह. म्हणाली - नवीन वर्षाची आतुरतेने वाट बघत आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रकुलची कोरोना टेस्ट निगेटिव्ह अली आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने 7 दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यासह तिने तिच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले होते. आता रकुलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. रकुलची कोरोना टेस्ट निगेटिव्ह अली आहे. एका पोस्टद्वारे तिने ही माहिती दिली आहे. रकुल काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि अमिताभ बच्चन स्टारर 'मेडे' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती.

रकुल म्हणाली अजून प्रतीक्षा करु शकत नाही
रकुलने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ''माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली हे सांगताना मला आनंद होतोय. मी पूर्णपणे ठीक आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. चांगले आरोग्य आणि सकारात्मकतेने भरलेल्या नवीन वर्षाची आतुरतेने वाट बघत आहे.''

रकुलच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे म्हणजे, ती मेडे या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. चित्रपटात अजय देवगन आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात रकुल पायलटच्या भूमिकेत आहे. 11 डिसेंबरपासून अजयने शूटिंग सुरू केली आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माताही तो आहे. अजयचे प्रॉडक्शन हाऊस 'अजय देवगन फिल्म' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होईल.

3 महिन्यांपूर्वी एनसीबीने केली होती रकुलची चौकशी
सुमारे तीन महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांची एनसीबीने चौकशी केली होती. मॅनेजर करिश्मा प्रकाशचे चॅट व्हायरल झाल्यानंतर दीपिकाचे नाव या प्रकरणात जोडले गेले. तर रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांची नावे घेतली होती. टॅलेंट मॅनेजर जया साहाचे चॅट व्हायरल झाल्यानंतर श्रद्धाचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...