आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लूक:'डॉक्टर जी' चित्रपटातील रकुल प्रीत सिंहची पहिली झलक आली समोर, भूमिकेसाठी घेतले खास वैद्यकीय प्रशिक्षण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुभूति कश्यप यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

रकुल प्रीत सिंह पहिल्यांदा आयुष्मान खुरानासोबत जंगली पिक्चर्सच्या कॅम्पस कॉमेडी ड्रामा 'डॉक्टर जी'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी नुकताच चित्रपटातील रकुलचा बहुप्रतीक्षित फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

'डॉक्टर जी' या चित्रपटातील डॉक्टर फातिमाची व्यक्तिरेखा सहज वाटण्यासाठी रकुलला मेडिकल टर्मोनोलॉजी आणि काही महत्वपूर्ण सर्जिकल प्रक्रियांबाबतच्या डेटेलिंग्जचा देखील अभ्यास करावा लागला. ऑपरेशन्स आणि इतर वैद्यकीय जगाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टींना स्क्रीनवर प्रामाणिकपणे दाखवण्यासाठी निर्मात्यांनी रकुल, आयुष्मान, शेफाली यांना आपल्या व्यक्तिरेखेच्या तयारीचा भाग म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी त्यांचे तज्ज्ञांसोबत खास सेशन्स आयोजित करण्यात आले होते.

आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना रकुल म्हणाली की, ''डॉक्टर जी'चे चित्रीकरण हा एक सुंदर अनुभव राहिला आहे. यामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका साकारत असल्यामुळे, यातील व्यवहार आणि काम परफेक्ट असणे आवश्यक होते. स्क्रीनवर वास्तविक दिसण्यासाठी मेडिकलशी निगडित मुख्य गोष्टी जाणून घेणे अनिवार्य होते. डॉक्टर फातिमा बनण्याचा प्रवास ही एक अद्भुत प्रक्रिया होती जी मी नेहमीच माझ्याजवळ जपून ठेवू इच्छिते.”

अनुभूति कश्यप दिग्दर्शित, 'डॉक्टर जी' एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे, ज्याचे सह-लेखक सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच प्रयागराजमध्ये एक शूटिंग शेड्यूल पूर्ण केले असून चित्रपट या महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...