आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरण:रियाशी ड्रग चॅटची रकुलची कबुली; दीपिका पदुकोण, सारा अली खान व श्रद्धा कपूरची आज चौकशी

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलीवूडमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करत असलेल्या नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शुक्रवारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची पाच कसून तास चौकशी केली. रकुलप्रीत सकाळी १०:३० च्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली व दुपारी २:३० वाजता बाहेर पडली.

एनसीबीने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा दिग्दर्शक क्षितिज रवी प्रसादच्या घरासह एका ठिकाणी छापा मारला. प्रसादच्या घरून कमी प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. प्रसादला घेऊन एनसीबी अधिकारी कार्यालयात गेले. तेथे प्रसादची चौकशी करण्यात आली. धर्मा प्रॉडक्शनचा सहदिग्दर्शक व क्षितिजचा निकटवर्तीय अनुभव चोप्रा व दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशचीही चौकशी करण्यात आली. त्यांना ड्रग्ज चॅट आणि गांजा-मारिजुअाना खरेदीच्या नेटवर्कबाबत प्रश्न विचारण्यात आले.

सुशांतचा गळा दाबून खून : वकील विकास सिंह
सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी दावा केला की, गळा दाबूनच सुशांतची हत्या करण्यात आली. हा प्रकार आत्महत्या म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. सीबीअायच्या तपास अहवालातील विलंब निराशाजनक आहे. तपास कार्यातील एम्सच्या एका डॉक्टरने आपल्याला सांगितले होते की सुशांतचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे, गळफास घेतल्याने नाही.

भावाद्वारे ड्रग्ज मागवायची रिया : एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शाैविकच्या माध्यमातून ड्रग्ज खरेदी करून सुशांतला द्यायची. वांद्र्याचा ड्रग तस्कर अब्दुल बासित परिहारच्या चौकशीतून शाैविकचे नाव समोर आले हाेते. शाैविकने परिहार व कैझान इब्राहिमकडून गांजा आणि मारिजुअाना विकत घेतल्याची कबुली दिली आहे.

दीपिका, सारा अली खान व श्रद्धा कपूरवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप
एनसीबीने शनिवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान व श्रद्धा कपूरला चौकशीसाठी पाचारण केले आहे. या तिघींवर ड्रग्ज सेवनाचा आरोप आहे. दीपिका व तिच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही ड्रग्जबाबत चर्चा झाल्याचे समोर आले होते. दीपिकाच्या चौकशीच्या वेळेस आपल्यालाही सोबत राहू द्या, अशी विनंती तिचा पती रणवीर सिंहने केल्याच्या वृत्ताचा एनसीबी अधिकाऱ्यांनी इन्कार केला.

मीही ड्रग्ज घेतले : रकुलप्रीत सिंह
सूत्रांनुसार, रकुलप्रीतने रिया चक्रवर्तीसोबत ड्रग्जबाबत चॅट केल्याची कबुली दिली आहे. आपण ड्रग्ज घेत असल्याचे रकुलने कबूल केले आहे. ड्रग्जच्या व्यवहारांसाठी एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. यात जवळपास डझनभर लोकांचा समावेश होता. दीपिकासह आणखी दोन मेंबर ग्रुपचे अॅडमिन होते. या ग्रुपमध्ये मधू मंटेना आणि ध्रुव यांचा समावेश होता. तसेच जया साहा, करिश्मा प्रकाश आणि क्वॉन कंपनीच्या हेडचाही ग्रुपमध्ये समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...