आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. एकीकडे पठाणचे यश साजरे करत असताना शाहरुखने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू केले आहे. आता शाहरुख एटली दिग्दर्शित 'जवान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने या चित्रपटाची ऑफर नाकारल्यानंतर आता दक्षिणेतील एक बडा अभिनेता चित्रपटात झळकणार आहे.
अल्लू अर्जुनला ऑफर झाला होता चित्रपट
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण अभिनेत्याने ही ऑफर नाकारली आहे. या चित्रपटात तो कॅमिओ करणार होता. पण सध्या तो त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या कारणास्तव त्याने कॅमिओला नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या जागी आणखी एका मोठ्या साऊथ सुपरस्टारला कॅमिओसाठी संपर्क साधला आहे.
सुपरस्टार रामचरणची झाली एन्ट्री
एटली कुमार 'जवान' हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट सुपरहिट करण्यात एटली कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनच्या नकारानंतर निर्मात्यांनी 'जवान'मध्ये कॅमिओसाठी आणखी एका साऊथ सुपरस्टारची निवड केली आहे. तो दुसरा कोणी नसून 'RRR' सुपरस्टार राम चरण आहे.
राम चरणने 'आरआरआर'मध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. शिवाय त्याचा हा चित्रपट जगभरात गाजला. ऑस्कर 2023 साठी चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकनही मिळाले आहे. अशा परिस्थितीत राम चरणचे चाहतेही त्याच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे 'जवान'च्या निर्मात्यांनाही चित्रपटात साऊथचा मोठा स्टार हवा होता, त्यामुळे राम चरणला चित्रपटात कॅमिओची ऑफर देण्यात आली आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे 'जवान'
विशेष म्हणजे 'जवान'मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त सुपरस्टार विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमसी स्टॅन 'जवान'च्या एका गाण्यात दिसणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण महाराष्ट्रात झाले आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात पुणे मेट्रो देखील दाखवण्यात आली आहे. 'जवान'चे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर एमसी स्टॅनचा आवाज चित्रपटातील कोणत्याही गाण्यात समाविष्ट करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.