आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RRR:राम चरणने थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना दिला सुखद धक्का, काळे कपडे आणि अनवाणी पायांनी दिसला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता 41 दिवस अनवाणी पायाने राहणार

अभिनेता राम चरण रविवारी चाहत्यांच्या भेटीसाठी मुंबईतील गेयटी थिएटरमध्ये पोहोचला. त्याला बघताच चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या RRR या चित्रपटाला एवढे प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानण्यासाठी अभिनेता थिएटरमध्ये पोहोचला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये राम चरण चाहत्यांच्या गर्दीत दिसतोय.

राम चरणने चाहत्यांच्या प्रेमाचा केला स्वीकार

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रामचरणने काळे कपडे परिधान केलेले आहेत. केरळमधील शबरीमाला मंदिरात जाईपर्यंत पुढील काही आठवडे तो असाच पोशाख परिधान करणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिपही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राम चरण चाहत्यांना अभिवादन करताना दिसतोय.

अभिनेता 41 दिवस अनवाणी पायाने राहणार
राम चरण सध्या अयप्पांच्या दीक्षेचे पालन करत आहे. ज्यामध्ये भगवान अयप्पाचे भक्त केरळमधील शबरीमाला मंदिरात जाण्यापूर्वी 41 दिवसांचा उपवास करतात. याशिवाय भक्तांना 41 दिवसांपर्यंत व्रत, काळे कपडे घालणे, ब्रह्मचर्य जीवनाचे पालन, अनवाणी पायाने चालणे, जमिनीवर झोपणे, रोज संध्याकाळी पूजा आणि गळ्यात तुळशीमाल घालण्याचे विधी करावे लागतात. शबरीमाला मंदिरात भाविक डोक्यावरुन इरुमूडी घेऊन जातात, यात देवाला अर्पण करणा-या गोष्टी समाविष्ट असतात. रामचरण पूर्वी अभिनेता अजय देवगण, अमिताभ बच्चन, विवेक ओबरॉय यांच्यासह अनेक कलाकारांनी या पूजेत भाग घेतला आहे. शबरीला मंदिर हे 800 वर्षे जुने मंदिर असून जंगलांनी वेगळेले आहे.

राजामौलींसोबत दुस-यांदा केले काम
राम चरणचा नुकताच प्रदर्शित झालेला 'RRR' हा जागतिक स्तरावर यशस्वी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राम चरणने दुसऱ्यांदा दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्यासोबत काम केले आहे. याआधी दोघांनी 'मगधीरा' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'RRR' ही 1920 च्या स्वातंत्र्यपूर्व काळात रचलेली एक काल्पनिक कथा आहे, जी अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन फ्रीडम फायटर्सच्या जीवनावर आधारित आहे.

700 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला चित्रपट
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'आरआरआर' हा चित्रपट 500 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 700 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...