आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम गोपाल वर्मा यांचे स्पष्टीकरण:द्रौपदी मुर्मू यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावर म्हणाले - मला जे वाटते ते मी बोलतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम गोपाल यांनी द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल काय म्हटले होते

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राम गोपाल वर्मा यांना अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारण्यात आले. त्याचे उत्तर देताना ते म्हणाले की, मला जे काही वाटते, तेच मी बोलत असतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, ज्याबद्दल देशभरातून रामू यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले होते

राम गोपाल वर्मा यांनी दिले स्पष्टीकरण
राम गोपाल यांच्यावर देशभरातून द्वेषपूर्ण प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आता सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, 'मला जे काही वाटते, ते मी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतो. सोशल मीडिया अकाउंट असण्याचा हाच उद्देश आहे. जर तुम्हाला काही बोलायचे नाही, तर तुम्ही या व्यासपीठावर का आहात?,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

तुम्हाला मी वेडा वाटत असेल तर अनफॉलो करा - राम गोपाल

राम गोपाल वर्मा यांना काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, लोक त्यांना विक्षिप्त म्हणतात, त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते, 'जर लोक मला वेडा समजत असतील तर मला अनफॉलो करा. मला काही फरक पडत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. माझ्याबद्दल असा विचार करणाऱ्या लोकांसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. सार्वजनिक डोमेनमध्ये मी माझे मत मांडतो," असे ते म्हणाले होते.

राम गोपाल यांनी द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल काय म्हटले होते

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत?" या ट्विटवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. यासोबतच सोशल मीडियावरही लोक कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत.

भाजप नेत्यांची कठोर कारवाईची मागणी
रामू यांच्या ट्विटची दखल घेत तेलंगणाचे भाजप नेते गुडूर रेड्डी यांनी राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात हैदराबादमधील अबिड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. वर्मा यांनी एनडीएच्या उमेदवाराविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासोबतच आंध्र प्रदेश भाजपचे प्रमुख सोमू वीरराजू यांनीही वर्मा यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

रामू यांनी दिले होते स्पष्टीकरण
त्यावेळी वाढता वाद पाहता रामू यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी लिहिले होते, त्यांनी हे उपरोधिकपणे म्हटले असून त्यांचा दुसरा कोणताही उद्देश नाही. "द्रौपदी हे माझे महाभारतातील आवडते पात्र आहे पण हे नाव फार दुर्मिळ आहे, मला त्यांच्याशी निगडित पात्रे आठवली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता," असे रामू यांनी ट्विट करुन म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...