आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनच्या काळात शूटिंग:इंडस्ट्री युनियनच्या परवानगीशिवाय राम गोपाल वर्मा यांनी केले चित्रपटाचे चित्रीकरण, आता फेडरेशन कारवाई करणार 

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रामू म्हणाले - ''मी कोणत्याही इंडस्ट्री युनियन मेंबरची परवानगी घेतली नाही, कारण ते सर्व इमॅच्युअर आहेत.''

25 मे रोजी अक्षय कुमारने एका शॉर्ट फिल्मची शूटिंग पूर्ण केली. तर बुधवारी राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘कोरोनाव्हायरस’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. सरकारच्या आदेशावरुन अक्षय कुमारने शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण केले होते. पण राम गोपाल वर्माचा चित्रपट फुल लेन्थ फीचर फिल्म आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटांच्या शूटिंगवर फिल्म इंडस्ट्रीतील विविध बड्या संघटनांनी बंदी घातली आहे. त्यामुळे राम गोपाल वर्मांनी परवानगी न घेतला आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण कसे केले, याची  उत्तरे स्वतः त्यांनी दिव्य मराठीला दिली आहेत.

  • या विषयावर चित्रपट करता येईल, असा विचार तुम्ही कधी केला?

पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊन जाहिर झाले होते, त्यानंतर आठवड्याभराने मी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. या संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत मी चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली.

  • तुम्ही फिल्म युनियनकडून चित्रीकरणासाठी परवानगी घेतली होती का?

मी कोणत्याही इंडस्ट्री युनियन मेंबरकडून चित्रीकरणासाठी परवानगी घेतली नाही, कारण ते सर्व इमॅच्युअर आहेत. सध्याच्या अत्यंत बिकट परिस्थितीत आपण सर्वांनी नवीन मार्ग कसे तयार करावे याचा विचार केला पाहिजे. चित्रपटांचे चित्रीकरण करावे आणि काम केले जावे. ते म्हणतात ना, 'गरज ही शोधाची जननी आहे.' 

  • शूटिंग दरम्यान सोशल डिस्टेन्सिंगचा नियम पाळला जात होता का?

होय, आम्ही सर्व मार्गदर्शकतत्त्वांचे कठोरपणे पालन केले. सर्व खबरदारी घेतली गेली. म्हणूनच आम्हाला इंडस्ट्री युनियनकडून कोणतीही परवानगी घ्यावी लागली नाही.

  • चित्रपटाची कथा काय आहे?

ही एका कुटुंबाची कहाणी आहे ज्यात घरातील सदस्यांचे एकमेकांसोबत फारसे पटत नाही, परंतु प्रत्येकाला एकमेकांसोबत राहावे लागते. मग जेव्हा लॉकडाऊनचा कालावधी सुरु होतो, तेव्हा प्रत्येकाला एकमेकांचा खरा चेहरा कोणता आहे? याविषयी समजते. विशेषत: जेव्हा व्हायरस त्यांच्या मागे असतो.

  • या चित्रपटासाठी किती ठिकाणी शूट केले?

आम्ही हा चित्रपट एकाच लोकेशनवर घरात शूट केला आहे. सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार नवीन आहेत.

  • फेडरेशनकडून कारवाई केली जाईल

या प्रकरणात फेडरेशनचे प्रमुख बीएन तिवारी म्हणाले की, आम्ही रामूच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. चित्रपटाच्या एका शॉटमध्ये अर्धा डझनहून अधिक कलाकार दिसले आहेत. तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे झाले, हे समजण्यापलीकडे आहे. साहजिकच आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. त्याचप्रमाणे त्यांचे कर्मचार्‍यांना, उद्योगातील रोजंदारीवर काम करणारे मजुर आणि इतरांचे दीड कोटी रुपये न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या संदर्भात आम्ही त्यांना आधीच कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आता या चित्रपटासाठीही कारवाई केली जाईल.

  • परिस्थिती सामान्य झाल्यावर मी पैसे देईन: राम गोपाल वर्मा

दीड कोटींच्या थकबाकीचा संंबंध कोरोनाव्हायरस या चित्रपटाशी नाहीये. परिस्थिती सामान्य होताच सर्व पैसे चुकवले जातील. आमच्या चित्रपटात 6 कलाकार आहेत. ते सर्व नवीन आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले आहे. आता हा चित्रपट एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा विचार आम्ही करत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...