आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर मुलाखतीत राम गोपाल वर्मांचे असभ्य वर्तन:अभिनेत्रीचा ऑनस्क्रीन चाटला पाय, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटक-यांची टीका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओत ते चक्क एका अभिनेत्रीच्या पायाला किस करताना दिसत आहेत. स्वतः रामू यांनी याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या व्हिडिओवरुन त्यांच्यावर टीका देखील होतेय.

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत रामू अभिनेत्रीच्या पायाशी बसलेले दिसत आहेत. अभिनेत्रीच्या पायाला किस करुन ते थांबले नाहीत तर त्यानंतर ते तिचे पाय चाटकाना दिसत आहेत. 'डेंजरस आशू रेड्डीबरोबरचा संपूर्ण व्हिडिओ... तुमच्या जोखीमेवर बघा' असे कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिले आहे. रामू यांनी अशा पद्धतीने त्यांच्या आगामी 'डेंजरस' या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटात अप्सरा रानी आणि नैना गांगुली लीड रोलमध्ये आहेत. चित्रपटात राजपाल यादवही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ही एक लेस्बियन क्राइम स्टोरी आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय.

कोण आहे ही अभिनेत्री?
राम गोपाल वर्मांसह व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री तेलुगु चित्रपटसृष्टीतील आहे. आशू रेड्डी असे तिचे नाव असून तिने अनेक तेलुगु चित्रपटांत काम केले आहे. ‘बिग बॉस तेलुगु’ तिसऱ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. राम गोपाल वर्मा यांनी आशू रेड्डीला मुलाखत दिली आहे. त्याच मुलाखतीमधील हा व्हिडिओ आहे.

सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत रामू
'रंगीला', 'कंपनी', 'सत्या', आणि 'सरकार', 'रन', 'वीरप्पन', 'आग' असे अनेक दमादर चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा काही वर्षापासून वादग्रस्त ट्विट आणि व्हिडिओंमुळेही चर्चेत असतात. त्यांच्या हा नवीन व्हिडिओ पाहून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.राम गोपाल वर्मा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...