आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह:करण जोहर आणि घराणेशाहीला रामूंचा पाठिंबा, म्हणाले- '12 वर्षे पैसा-प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुशांतला आऊडसाइड असल्याचे समजले'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घराणेशाहीशिवाय समाजव्यवस्था ढासळेल, असे राम गोपाल वर्मा म्हणाले आहेत.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण इंडस्ट्रीत घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. याप्रकरणात करण जोहरला सतत लक्ष्य केले जात आहे, ज्याने आपल्या चित्रपटांतून अनेक स्टारकिड्सला लाँच केले. आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा करणच्या बचावासाठी पुढे आले आहे. त्यांच्या मते, घराणेशाहीशिवाय समाजव्यवस्था ढासळेल. 

रामू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अनेक ट्विट करुन करण जोहरचा बचाव केला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले, 'जे घडले त्यासाठी करण जोहरला दोषी ठरवणे, हे सिद्ध करते की, लोकांनी फिल्म इंडस्ट्रीला समजूनच घेतले नाही. कुणासोबत काम करायचे अथवा नाही, हे फिल्ममेकर ठरवेल', असे ते म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी लिहिले की, 'सुशांत 12 वर्षे पैसे आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर आपले आयुष्य संपवतो कारण त्याला परका असल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत त्या 100 कलाकारांची आत्महत्या देखील न्याय्य आहे, ज्यांना सुशांतच्या आजूबाजूला पोहोचताही आले नाही. आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये आपण आनंदी नसल्यास आपण कधीही आनंदी होऊ शकत नाही. अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडचे अनेक आतील लोकसुद्धा पहिले आऊटसाइडरच होते. करण जोहर इनसाइडर आहे म्हणून यशस्वी झाला नाही, तर त्याचे कारण म्हणजे लाखो लोक त्याचे चित्रपट पाहतात', असे रामू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

एकापाठोपाठ एक ट्विट करताना रामू यांनी पुढे लिहिले, 'बॉलिवूड एक कठीण क्षेत्र आहे, कारण तुम्ही जितके जास्त वर जाल तितकेच लवकर जमीनीवर येऊ शकता. सुशांतने आकाशाला गवसणी घातली होती. पण ज्यांनी कधी टेकऑफ घेतला नाही त्यांचे काय? मग त्यांनीही जगाला दोष देऊन स्वत: ला संपवावे?', असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

घराणेशाहीमुळे समाज चालतो - राम गोपाल वर्मा

रामूंनी आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, 'घराणेशाहीशिवाय समाज कोसळेल, कारण नेपोटिजम (कुटुंबाचे प्रेम) मुळात सामाजिक रचनेचे तत्व आहे. ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्या पत्नीवर जास्त प्रेम करू शकत नाही आणि ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम नाही करू शकत,' असेही ते म्हणाले आहेत.  

Advertisement
0