आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:इनाया सुल्तानासोबत डान्स करताना दिसले राम गोपाल वर्मा, नेटक-यांनी केले ट्रोल; दिग्दर्शक म्हणाले - 'तो मी नव्हेच'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि अभिनेत्री इनाया सुल्ताना यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत राम गोपाल वर्मा रंगीला या चित्रपटातील हाय रामा या गाण्यावर इनायासोबत डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओत रामू विचित्र पद्धतीने अभिनेत्रीसोबत डान्स करत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, ‘मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचे आहे की या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दिसतेय, ती मी नाही आणि लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जी मुलगी आहे ती इनाया सुल्तान नाही. मी अमेरिकचे राष्ट्रपती जो बायडन यांची शपथ घेतो,’ अशा आशयाचे कॅप्शन राम गोपाल वर्मा यांनी दिले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. त्यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ’मला माझ्या डोळ्यांवर विश्वास होत नाही आहे…हे कस वाटतं आहे आणि ती महिला त्याला दूर करण्याचा प्रयत्न का करत नाही.’

तर आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘तिच्यासारख्या मुलींमुळेच बहुतेक निर्माते इतर नवोदितांना अशी वागणूक देतात. फक्त एका छोट्या भूमिकेसाठी तिने हे सगळे करण्याची परवानगी दिली आहे मग एका चित्रपटामध्ये एका महिलेच्या मुख्य भूमिकेसाठी किती अटी असतील याचा विचार करा.’

ट्रोल झाल्यानंतरदेखील राम गोपाल वर्मा यांनी इनायासोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले, 'सुंदर इनाया सुल्ताना, माझी डान्स पार्टनर, जिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.'

व्हायरल झालेला व्हिडिओ इनायाच्या बर्थडे पार्टीतील आहे. या पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इनाया आणि राम गोपाल वर्मा यांनी शेअर केले होते.

बातम्या आणखी आहेत...