आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत आणखी एक आत्महत्या:प्रसिद्ध चित्रकार आणि छायाचित्रकार राम इंद्रनील कामतची आत्महत्या, बाथटबमध्ये आढळला मृतदेह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनास्थळावरून एक सुसाइड नोटही सापडली आहे, त्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी एडीआर नोंदविला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार आणि छायाचित्रकार राम इंद्रनील कामत यांचा मृतदेह बुधवारी रात्री त्यांच्या माटुंगा स्थित फ्लॅटमधील बाथटबमध्ये आढळला आहे.याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस आत्महत्या म्हणून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

घटनास्थळावरून एक सुसाइड नोटही सापडली आहे. यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले नाही. तथापि, मृत्यू विषबाधामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर याची पुष्टी होईल.

  • तणावात होते राम इंद्रनील कामत

41 वर्षीय राम कामत ब-याच काळापासून तणावात होते आणि लॉकडाऊनमुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती, असे सांगितले जात आहे. ते आपल्या आई आणि बहिणीसमवेत राहत होते. त्यांचे लग्न झाले नव्हते. राम इंद्रनील कामत यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची पोलिस चौकशी करत आहेत.

  • अशी समोर आली राम कामत यांच्या मृत्यूची बातमी

राम कामत यांच्या आईने चौकशी दरम्यान सांगितले की, बुधवारी संध्याकाळी ते अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते आणि बराच काळ उलटूनही बाहेर आले नाहीत. यानंतर आईने शेजारी राहणा-या लोकांना बोलावले आणि बाथरुमचे दार तोडले असता ते बेशुद्धावस्थेत बाथटबमध्ये आढळले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...