आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण' वादात राम कदमांची उडी:हिंदुत्वाचा अपमान करणारी कोणतीच 'फिल्म' चालू देणार नाही, राम कदमांचा थेट इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण या आगामी चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे वादाच्या भोव-यात सापडले आहे. अनेक स्तरातून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या वादात आता भाजप आमदार राम कदम यांनी उडी घेतली आहे.

'पठाण' चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे, त्यामुळे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी, असे आवाहन राम कदम यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे.

पुढे ट्वीटमध्ये ते म्हणाले, "साधू-संतानी जे आक्षेप घेतलेत, त्यावर निर्माता-दिग्दर्शकाचे काय म्हणणे आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावे. महाराष्ट्रच्या भूमीवर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही 'फिल्म' अथवा सिरीयल चालू देणार नाही आणि ती खपवूनही घेतली जाणार नाही," असा कडक इशारा राम कदम यांनी दिला आहे.

'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्यास थिएटर जाळा - महंत राजुदास
ज्या चित्रपटगृहांमध्ये 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित होईल, ते जाळून टाका, असे विधान हनुमानगढीचे महंत राजुदास यांनी केले आहे. महंत राजुदास म्हणाले, 'बॉलिवूड-हॉलिवूड सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सनातन धर्म आणि संस्कृतीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असतात. हिंदू देवतांचा अवमान केला जातो. पठाण चित्रपटात ज्या प्रकारे भगवा, संतांचा रंग, राष्ट्राचा रंग, देशाचा रंग, सनातन संस्कृतीचा रंग यांचा अपमान करण्यात आला आहे, हे खूप दुःखदायक आहे,' असे ते म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, 'शाहरुखने सनातम धर्म संस्कृतीची एकदा नव्हे तर अनेक वेळा खिल्ली उडवली आहे. आता दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी घालून लोकांच्या श्रद्धा दुखावण्याची काय गरज होती. मी प्रेक्षकांना अशा चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो. ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जाईल, ते जाळून टाका. असे न केल्यास ते ताळ्यावर येणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही दुष्टांशी वाईट वर्तन करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,' असे विधान त्यांनी केले आहे.

आग्रा येथे हिंदू महासभेने म्हटले - हा सीन हटवला नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

आग्रा येथील हिंदू संघटनांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. बोल्ड सीन न हटवल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. महासभेचे सरचिटणीस अवतार सिंग गिल यांनी हे हिंदूंच्या भावना जाणूनबुजून दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. सेन्सॉर बोर्डाने परवानगी का दिली असा त्यांचा सवाल आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक आहे. संपूर्ण आग्र्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

प्रयागराजमध्येही 'पठाण'चा निषेध, पोस्टर जाळले, म्हणाले- अपमान सहन केला जाणार नाही
'पठाण' चित्रपटाच्या निषेधार्थ बुधवारी प्रयागराजमध्ये शाहरुख आणि दीपिकाचे पोस्टर जाळण्यात आले. मुठीगंज चौकात पोस्टर जाळल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी 'पठाण' चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केल्याचा आरोप केला. भाजप नेते राजेश केसरवानी म्हणाले की, 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात भगव्या रंगासह अश्लीलतेचा वापर हा संपूर्ण हिंदू संस्कृतीचा अपमान आहे, जो कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.

'पठाण' या चित्रपटाशी संबंधित अधिक बातम्या वाचा...

  • दीपिका पदुकोण आणि वाद:'पठाण'च नव्हे यापूर्वी 'हे' चित्रपटही अडकले होते वादात, जीवे मारण्याची मिळाली होती धमकी

दीपिकाचा एखादा चित्रपट वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही तिचे अनेक चित्रपट वादाच्या भोव-यात सापडले होते. इतकेच नाही तर तिला नाक कापण्याची आणि जीवे मारण्याची धमकीदेखील मिळाली होती. एक नजर टाकुया आतापर्यंत वादात सापडलेल्या दीपिकाच्या चित्रपटांवर... वाचा सविस्तर...

  • पठाण वादावर शाहरुखने तोडले मौन:म्हणाला- नकारात्मक विचारांपासून दूर राहायचे, जगाने काहीही करो

पठाण वादावर अभिनेता शाहरुख खानने मौन तोडले आहे. या चित्रपटाच्या वादात शाहरुखने पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. गुरुवारी कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख म्हणाला - जग काहीही करो. मी आणि तुम्ही जे सकारात्मक लोक आहेत... ते सर्व जिवंत आहोत! शाहरुखचा इशारा सोशल मीडियावर चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांकडे होता. काय म्हणाला शाहरुख वाचा...

  • 'पठाण'चा वाद पेटला:इंदुरात संघटनेने जाळले शाहरुख-दीपिकाचे पुतळे, गृहमंत्र्यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा

किंग वाचा सविस्तर...

  • दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून वादंग:ही बिकिनी डिझाइन करणारी डिझायनर कोण? जाणून घ्या

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आगामी पठाण हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले आणि वादाला तोंड फुटले. या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन हे वादंग उठले आहे. पण दीपिकाने या गाण्यामध्ये परिधान केलेली बिकिनी कुणी डिझाइन केली हे आता समोर आले आहे. कोण आहे ही डिझायनर जाणून घ्या...

  • भगव्या कपड्यांमधील दीपिकाच्या बोल्ड लूकला विरोध:पठाण चित्रपटात हॉट सीन्स; मध्य प्रदेशचे गृहमंत्री म्हणाले- ती टुकडे-टुकडे गँगची समर्थक

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. बुधवारी त्याचा टीझर रिलीज करण्यात आला. त्याचे पहिले गाणे 'बेशरम रंग...' देखील रिलीज झाले आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने अतिशय हॉट आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे, त्यामुळे चित्रपटाला विरोध केला जात आहे. वाचा सविस्तर...

  • कॉपी आहे पठाणचे 'बेशरम रंग' गाणे!:फ्रेंच गाण्याशी मिळतेजुळते आहे बॅकग्राउंड बीट, सोशल मीडियावर होत आहे ट्रोल

दीपिका वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...